Headlines

IPL मुळे Andrew Symonds चं खास मित्राशी भांडण, पैशांमुळे नात्यात दुरावा

[ad_1]

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू Andrew Symonds यांचा कार अपघातात मृत्यू झाला. जगातील महान ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. सायमंड्स जेवढा आपल्या खेळाच्या कौशल्यासाठी ओळखला जायचा तेवढाच तो विवादांमुळेही चर्चेत राहिला आहे. 

त्याने नुकताच आयपीएलवरून मोठा दावा केला होता. सायमंड्स आणि मायकल क्लार्कमध्ये आयपीएलमुळे भांडण झाल्याचं त्याने यामध्ये सांगितलं होतं. खास मित्र आयपीएलमुळे भांडले आणि त्यांच्या नात्यात फूट पडल्याचा दावा त्याने केला होता. 

अँड्र्यू सायमंड्स आणि मायकेल क्लार्क आयपीएलच्या पहिल्या सत्रात एकत्र खेळले होते. 2015 मध्ये सायमंड्सने क्लार्कच्या कर्णधारपदावर टीका केली होती. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने आरोप केला होता की 2008 मध्ये वन डे सीरिज खेळण्याआधी क्रिकेटर नशेत होता. 

त्यावेळी दोन खास मित्र म्हणून ओळखली जाणारी ही जोडी फुटली. त्यानंतर 2015 च्या ऍशेज डायरीमध्ये क्लार्कने सायमंड्सच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं, ‘अँड्र्यू सायमंड्स टीव्हीवर माझ्या नेतृत्वावर टीका करण्यासाठी गेला होता. मला याबाबत अत्यंत वाईट वाटलं. 

साइमंड्सचा धक्कादायक खुलासा
एका मुलाखतीदरम्यान साइमंड्सने अनेक किस्से सांगितले त्यावेळी एक धक्कादायक खुलासाही केला. मेथ्यू हेडनने त्याला सांगितलं की आयपीएलमध्ये जास्त पैसे मिळणार होते. त्यामुळे त्याच्या मनात ईर्ष्येची भावना निर्माण झाली.

2008 च्या आयपीएलमध्ये सायमंड्स सर्वात महागडा खेळाडू होता. डेक्कन चार्जर्सने 5.4 कोटी देऊन टीममध्ये घेतलं होतं. जेव्हा क्लार्क टीममध्ये आला तेव्हा मी त्याची पूर्ण काळजी घेत होतो. त्याच्याकडून उत्तम फलंदाजी करून घेण्याचाही प्रयत्न केला. 

पैसा खूप मजेशीर गोष्ट आहे. ती जेवढी चांगली तेवढीच वाईट किंवा विषारी आहे. याच पैशांमुळे क्लार्कसोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. क्लार्क आणि सायमंड्सची पैशांमुळे मैत्रीत चढाओढ निर्माण झाली. त्याचा परिणाम असा झाला की मैत्री टिकली नाही. याचं दु:ख सायमंड्सने सांगितलं.

शेन वॉर्ननंतर आणखी एका दिग्गज क्रिकेटपटूचं निधन झालं. या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासह क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. 

कार अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सायमंड्सला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र प्रकृती अत्यंत नाजूक होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सायमंड्सच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *