Headlines

IPL 2022: यंदाची आयपीएल कोणती चिअर लीडर गाजवणार? अखेर कळलं…

[ad_1]

मुंबई : सर्व क्रिकेट फॅन्स 26 तारखेची वाट पाहतायत. येत्या शुक्रवारपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. शुक्रवारी पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या खेळात ग्लॅमरचा तडकाही असतो. मात्र कोरोनाच्या काळात अनेक नियम बदल्यात आले. त्यातील एक नियम म्हणजे चिअरलीडर्सचा.

सध्या चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे आयपीएलच्या सामन्यांदरम्यान चिअरलीडर्सचा समावेश असणार का? यंदाच्या सिझनमध्ये चौकार-षटकार मारल्यावर चिअरलीडर्स दिसणार का?

2008 पासून आयपीएलच्या सामन्यांदरम्यान चिअरलीडर्स जलवा पहायला मिळणार आहे. भारतात आयपीएलनेच या कल्चरला सुरुवात केली होती. ज्यानंतर याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मात्र काही वेळा हा मुद्दा वादाच्या भोवऱ्यातंही सापडला.

दरम्यान आता कोरोनामुळे काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. आयपीएलमध्ये 2019 सालच्या सिझनमध्ये चिअरलीडर्स पहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर त्या सिझनमध्ये त्यांचा समावेश केला नव्हता. 

त्याचप्रमाणे आता, यंदाच्या सिझनमध्ये म्हणजेच 2022 मध्येही सामन्यांदरम्यान चिअरलीडर्स चाहत्यांना दिसणार नाहीत. कोरोनामुळे यावर्षी केवळ 4 स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे, खेळाडूंसाठी बायो-बबल तयार करण्यात आला आहे. याचमुळे चिअरलीडर्सना एंट्री देण्यात आलेली नाही.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *