IPL 2022 | दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी, हा कच्चा लिंबू असलेला संघ जिंकणार आयपीएल


मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) सुरुवात झालीय. प्रत्येक संघाने किमान एकतरी सामना खेळला आहे. आतापर्यंत क्रिकेट चाहत्यांना शानदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेल्याने स्पर्धेतील थरार आणखी वाढला आहे. दरम्यान यंदाचं आयपीएल चॅम्पियन कोण असणार याबाबत दिग्गज खेळाडूने भविष्यवाणी केली आहे. (ipl 2022 matthew hayden prediction about winner of 15th season)

ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर मॅथ्यू हेडनने (matthew hayden) आयपीएल 2022 बाबत भविष्यवाणी केली आहे. हेडनने आयपीएल विजेत्या असलेल्या प्रबळ दावेदार टीमचं नाव सांगितलं आहे.

हेडन काय म्हणाला? 

‘केकेआरविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. यामुळे सीएसके निराश होणार नाही. पराभव झाला असला तरी रवींद्र जाडेजाच्या  नेतृत्वाखाली टीमने चांगली कामगिरी केली. चेन्नईचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. पण त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. पुढच्या सामन्यात ते जोरदार मुसंडी मारतील याची मला खात्री आहे”, असा विश्वास हेडनने व्यक्त केला.

चेन्नईची टीम कमजोर

महेंद्रसिह धोनीने चेन्नईला आतापर्यंत एकूण 4 वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. मात्र आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी धोनीने कॅप्टन्सी सोडली. यानंतर रवींद्र जाडेजाला कॅप्टन करण्यात आलं.

जाडेजाकडे कर्णधारपदाचा फार अनुभव नाही. यावेळेस चेन्नईपेक्षा आधीपेक्षा मजबूत वाटत नाही. चेन्नईकडे यंदा फॅफ डु प्लेसिस नाही. तसेच यंदाही सुरेश रैना नाही. तर शार्दुल ठाकूरही यंदा दिल्लीकडून खेळतोय. 

हे तिन्ही खेळाडू चेन्नईचे तुरुपाचे एक्के होते. हे तिघे नसल्याने चेन्नईचा संघ काही असंतुलित दिसत आहे. Source link

Leave a Reply