Headlines

IPL 2022 | ‘टॉस विन मॅच’, पहिल्या 3 सामन्यात नंतर बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत 3 सामने खेळवण्यात आला आहेत. या तिन्ही सामन्यांचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईत करण्यात आलं. मात्र या तिन्ही सामन्यातील दुसऱ्या डावात बॅटिंग करणाऱ्या टीमचा विजय झाला. या तिन्ही सामन्यात कर्णधारांनी टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा निर्णयही योग्य ठरत आहे. त्यामुळे आता या मोसमात ‘टॉस विन मॅच’ (Toss Win Mathc) हे सूत्र पुढे जाताना दिसतंय. (ipl 2022 first 3 matches toss winner team elect to field first and they are win the match)

तिन्ही सामन्यात एकसारखाच ट्रेंड

आयपीएलच्या 15 व्या मोसमातील सलामीचा सामना हा चेन्नई विरुद्ध कोलकाता (CSK vs KKR) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) टॉस जिंकला. पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईला पहिली बॅटिंग करावी लागली. चेन्नईला बॅटिंग करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चेन्नईने 61 धावांवर 5 विकेट्स गमावल्या.

मात्र त्यानंतर बॉल सहजपणे बॅटवर येत होता. त्यामुळे चेन्नईने अखेरच्या 9 ओव्हरमध्ये 70 धावा केल्या. त्यानंतर कोलकाताने 132 धावांचं विजयी आव्हान हे 18.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. 

त्यानंतर रविवारी डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिला सामना हा कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यात खेळवण्यात आला.

दिल्लीचा युवा कॅप्टन रिषभ पंतने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 177 धावा केल्या. दिल्लीने हे विजयी आव्हान 18.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. 

डबल हेडरमधील दुसरा आणि मोसमातील एकूण तिसरा सामना हा डीवाय पाटील स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब विरुद्ध आरसीबी आमनेसामने होते.

पंजाबचा कॅप्टन मयंक अग्रवालने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. बंगळुरुने पहिले बॅटिंग करताना 205 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 206 धावांचं आव्हान मिळालं. मात्र पंजाबने हे मजबूत आणि मोठं वाटणार आव्हान 5 विकेट्स गमावून 1 ओव्हरआधीच गाठलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *