IPL 2022 : तिलक वर्माचे झुंजार अर्धशतक, चेन्नईला 156 धावांचे आव्हान

[ad_1]

मुंबई : तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने (Mumbai Indians) चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 156 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. (ipl 2022 mi vs csk mumbai indians set 156 runs target for winning to chennai super kings tilak varma shine)

सूर्यकुमार यादवने 32 धावांची खेळी केली. युवा ऋतिक शौकीनने 25 धावांचं योगदान दिलं. तर रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांनी घोर निराशा केली. रोहित आणि इशान या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर डेवाल्ड ब्रेविसही 4 धावा करुन माघारी परतला.

चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्राव्होने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल सॅंटनर आणि महेश तीक्ष्णा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.   
 
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, राइली मेरेडिथ, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनादकट.

सीएसकेचे अंतिम 11 शिलेदार : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *