IPL 2022 : श्रेयस अय्यरला तिने असं केलं प्रपोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल


IPL 2022 : भारतात क्रिकेट  (Cricket) हा फक्त एक खेळ नाही तर तो एक धर्म आहे. त्यातही आयपीएल (IPL 2022) म्हटलं की क्रिकेट फॅन्सचा उत्साह बघण्यासारखा असतो. 26 मार्चला सुरु झालेला आयपीएलचा पंधरावा हंगाम आता रंगतदार अवस्थेत आहे. केवळ पुरुषच नाही तर महिला चाहत्यांनाही आयपीएलची भूरळ आहे.

आपल्या आवडत्या टीमला आणि आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर करण्यासाठी अनेक चाहते मैदानावर उपस्थिती लावतात. कॅमेराचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी चाहते अनेक करामतीही करत असतात. सध्या एका महिला क्रिकेट फॅन्सचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्सदरम्यान (RR) मॅच खेळवली जात आहे. या सामन्यासाठी एक महिला क्रिकेट फॅन्स पोस्टर घेऊन स्टेडिअमवर पोहचली. या पोस्टरने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ही मुलगी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) प्रचंड फॅन आहे. विशेष म्हणजे तिला श्रेयस अय्यरशी लग्न करायचं आहे. 

आपल्या पोस्टरवर तिने लिहिलं होतं, माझ्या आईने मला मुलगा शोधायला सांगितलं आहे, श्रेयस अय्यर तू माझ्याशी लग्न करशील का? सोशल मीडियावर हे पोस्टर चांगलंच व्हायरल होत असून केकेआरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर या मुलीचा पोस्टरसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

क्रिकेट फॅन्सचा अनेक तऱ्हा
आयपीएलच्या स्टेडिअममध्ये क्रिकेट चाहत्यांचा वेगवेगळा अंदाज पाहिला मिळतो. काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट चाहत्याने झळकावलेलं पोस्टरही चर्चेत होतं. त्या पोस्टरवर त्याने लिहिलं होतं, माझ्या गर्लफ्रेंडने मला सांगितलं ‘मी किंवा आयपीएल, आणि मी येथे आहे’ (My Girlfriend Says Me or IPL, so I am here) 

दुसऱ्या क्रिकेट चाहत्याने आपल्या पोस्टरवर लिहिलं होतं, मी इथं हैदराबादच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलो आहे, पण केकेआरचा मालक आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलीला पाहून माझा विचार बदलला’Source link

Leave a Reply