IPL 2022 : सलग 5 पराभवांनंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानींचा ‘तो’ फोटो व्हायरल


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला एकंही विजय नोंदवता आला नाहीये. काल पुण्यात पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा सलग 5वा पराभव झाला. दरम्यान यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबईच्या टीमला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येतंय. 

दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये नीता अंबानी हाताची पाच बोटं दाखवतायत. पाचव्या पराभवानंतर अंबानींचा हा फोटो व्हायरल केला गेला. मुळात हा फोटो मुंबईने पाचवेळा आयपीएल जिंकल्यानंतरचा आहे.

याशिवाय मुंबई इंडियन्सच्या टीम्सवरही मीम्स तयार करण्यात आले असून त्यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. यावेळी युझर्सने, 2 पॉईंट्स नाहीत तर काय झालं, 5 ट्रॉफी तरी आहेत, अशा आशयाचं एक मीम बनवलं आहे.

शिवाय एक युझरने एक फोटो पोस्ट करत, आम्ही जिंकणार नाही, असं म्हटलंय. काहींनी 5 वेळा चॅम्पियन म्हणाताना हसत मुंबईच्या टीमची खिल्ली उडवली आहे. अशा पद्धतीने मुंबईच्या टीमला तसंच रोहितला देखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय मिळवला.  पंजाबने मुंबईला विजयासाठी 199 रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 186 रन्सचं करता आले. पंजाबच्या या विजयासह मुंबईचा हा या मोसमातील सलग पाचवा पराभव ठरला.Source link

Leave a Reply