IPL 2022 : रोहित शर्माच्या या 3 चुकांमुळे मुंबईचा सलग 6 सामन्यात पराभव?


मुंबई :  मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आयपीएलचा 15 वा हंगाम (IPL 2022) हा सर्वात वाईट राहिला आहे. मुंबईसमोर 14 व्या मोसमापर्यंत खेळण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ थरथर कापायचे. मुंबईसमोर खेळणं हे मोठं आव्हान असायचं. मात्र या 15 व्या सिजनमध्ये सर्वच उलटं पडलं.  मुंबईला या हंगामातील पहिल्या 6 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. (mi ipl 2022 know reason mumbai indians consecutive 6 match lost under rohit sharma captaincy)

कॅप्टन रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा चॅम्पियन केलं. या कामगिरीच्या जोरावर आणि एकूण नेतृत्वाचा अनुभव पाहूनच रोहितला टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटमधील कर्णधार करण्यात आलं.

मात्र या जबाबदारीनंतर रोहितची आयपीएलमधील कामगिरी ढासळली. कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटच्या नक्की कोणत्या गोष्टी चुकल्या ज्यामुळे मुंबईवर अशी स्थिती ओढावली, हे आपण जाणून घेऊयात.

मोजक्याच खेळाडूंवर अवलंबल्याचा फटका

मुंबईने 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकलं. रोहितची जमेची असलेली बाजूच त्याची आता उणीव ठरतेय. जसप्रीत बुमराह, हार्दिक आणि क्रृणाल पंड्या ट्रेन्ट बोल्ट यासारख्या खेळाडूंच्या जोरावर मुंबईने ट्रॉफी जिंकली. या खेळाडूंनी वेळोवेळी मुंबईला निर्णायक क्षणी सामने जिंकून दिले. त्यामुळे रोहितही या खेळाडूंवरच विसंबून राहिला.

रोहितने या खेळाडूंशिवाय मॅचविनर खेळाडू घडवलेच नाहीत किंवा तसं करण्याकडे लक्ष दिलं नाही. आता मेगा लिलावात बुमराहचा अपवाद वगळता सर्व खेळाडू दुसऱ्यांकडून खेळतायेत. यामुळेच आता बॉलिंग साईडमध्येही बुमराह एकटा पडलाय. बुमराहला साथ देण्यासाठी मुंबईकडे तोडीसतोड बॉलर नाही.

अचूक खेळाडूंच्या निवडीत चूक? 

मेगा लिलावात मुंबई टीमचा क्रिकेट डायरेक्टर झहीर खान आणि कॅप्टन रोहितने टीम निवडली. हीच टीम आता अनेक वर्ष कायम राहणार आहे. मुंबईतील स्टार खेळाडू दुसऱ्या टीममध्ये गेले. मात्र अजूनही त्यांच्यासारख्या खेळाडूंचा शोध अजूनही घेतला जात नाहीये.

जोफ्रा आर्चर उपलब्ध नसणार याची पूर्व कल्पना फ्रँचायजीला होती. मात्र यानंतरही मुंबईने त्याच्यावर पैशांचा पाऊस पाडला. फ्रँचायजीने हार्दिक, क्रृणाल, दीपक चाहर, क्विंटन डी कॉक आणि ट्रेन्ट बोल्ट सारख्यांचीउणीव भरुन काढू शकतील, अशा खेळाडूंना घेण्याकडे मुंबईचा कळ दिसला नाही. 

रोहितची निराशाजनक कामगिरी

या मोसमात आतापर्यंत कॅप्टन रोहितला ओपनर म्हणून टीमला अपेक्षित सुरुवात करुन देता आला नाही. क्विंटन डी कॉकने काही सामन्यात चांगली खेळी. मात्र त्याला त्यात सातत्य ठेवता आलं नाही. ही सलामी जोडी बऱ्याच सामन्यात चांगली ओपनिंग करण्यात अपयशी ठरली. Source link

Leave a Reply