Headlines

IPL 2022 | गरीब घरात जन्मलेला हा खेळाडू पहिल्याच सामन्यात ठरला हिरो

[ad_1]

IPL 2022 : राजस्थानने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव करून आयपीएल 2022 मध्ये तिसरा विजय नोंदवला. या विजयासह राजस्थानने (Rajasthan Royals) गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. या सामन्यात राजस्थानसाठी कुलदीप सेनने (Kuldeep Sen) अप्रतिम गोलंदाजी करत अखेरच्या ओव्हरमध्ये आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. स्टॉइनिससारख्या फलंदाजासमोर शेवटच्या षटकात (final over vs LSG) 15 धावा रोखणे हे कोणत्याही गोलंदाजासाठी कठीण काम होते, परंतु कुलदीप सेनने आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात ते करून दाखवले. त्याने राजस्थानसाठी सामन्यातील शेवटची ओव्हर टाकताना पहिल्या चार चेंडूंमध्ये केवळ एक धाव दिली आणि आपल्या संघाचा विजय निश्चित केला. यासह तो राजस्थानचा हिरो बनला.

कुलदीपसाठी आयपीएल (IPL) खेळणे आणि राजस्थानसाठी चमत्कार करणे इतके सोपे नव्हते. गरीब घरात जन्मलेल्या कुलदीपने (Kuldeep Sen) वर्षानुवर्षे संघर्ष करत आता हे स्थान मिळवले आहे.

कुलदीपचा जन्म मध्य प्रदेशातील रेवा (Reva) जिल्ह्यातील एका छोट्या गावात झाला. त्याचे वडील सलून चालवतात. घरातील मोठा मुलगा कुलदीपने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला फलंदाज म्हणून कारकीर्द घडवायची होती, पण नंतर प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून त्याने वेगवान गोलंदाजी सुरू केली. कुलदीप ज्या अकादमीत क्रिकेट शिकला त्या अकादमीने त्याची फीही माफ केली जेणेकरून तो त्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल.

2018 मध्ये कुलदीपने पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. तो मध्य प्रदेशच्या रणजी संघाचा भाग बनला. नंतर तो याच संघाकडून टी-20 सामनाही खेळला. त्याच्या पहिल्या रणजी मोसमात त्याने पंजाबविरुद्ध एका डावात पाच विकेट्ससह 25 विकेट घेतले. यानंतरही त्याची दमदार कामगिरी कायम राहिली आणि आतापर्यंत त्याने 16 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 44 बळी घेतले आहेत. त्याच्या नावावर लिस्ट ए मॅचमध्ये चार विकेट्स आणि टी-20 मध्ये 19 विकेट्स आहेत.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात कुलदीपला राजस्थान संघाने 20 लाखांना विकत घेतले. तोपर्यंत कुलदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला होता, पण त्याला अजून मोठ्या प्रमाणावर ओळख मिळू शकली नव्हती. ट्रेंट बोल्ट, प्रशांत कृष्णा आणि नवदीप सैनी या गोलंदाजांच्या उपस्थितीत कुलदीपला संधी मिळण्याची शक्यताही क्षीण होती, पण राजस्थानच्या चौथ्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि त्याने संधी सोडली नाही. पहिल्याच सामन्यात कुलदीपने शेवटच्या षटकात अप्रतिम कामगिरी करत आपली छाप सोडली आहे.

अखेरच्या षटकात लखनौ संघाला (Lucknow Super Giants) विजयासाठी 15 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर आवेश खान (Avesh Khan) स्ट्राईकवर होता आणि त्याने एक धाव घेत स्टॉइनिसला (Marcus Stoinis) स्ट्राइक दिली. आता लखनौला विजयासाठी 5 चेंडूत 14 धावांची गरज होती. एकापाठोपाठ तीन चेंडूंत कुलदीपने एकही धाव दिली नाही. ऑस्ट्रेलियासाठी अनेकवेळा अप्रतिम खेळी करणारा स्टॉइनिस त्याच्यासमोर असहाय दिसत होता. आता दोन चेंडूत लखनौला विजयासाठी 14 धावांची गरज होती आणि राजस्थानचा विजय निश्चित झाला. यानंतर स्टॉइनिसने एक चौकार आणि एक षटकार ठोकला, पण कुलदीपने आपले काम केले होते.

या सामन्यात कुलदीपने 4 षटकात 35 धावा देत एक बळी घेतला, मात्र अखेरच्या षटकात 15 धावा रोखत (Kuldeep defended 15 runs) त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

पाच भावंडांमध्ये कुलदीप सेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला दोन मोठ्या बहिणी आणि दोन लहान भाऊ आहेत. कुलदीपला या पातळीवर आणण्यात मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे आणि झारखंडचा क्रिकेटपटू आनंद सिंग यांचाही वाटा आहे. कुलदीप 140 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे आणि तो बॅटनेही योगदान देऊ शकतो. कुलदीप मोठे फटके खेळण्यातही पटाईत आहे. त्याची ही क्षमता त्याला T20 चा उपयुक्त खेळाडू बनवते.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *