Headlines

IPL 2022 या 5 धडाकेबाज खेळाडूंचा असू शकतो शेवटचा हंगाम, ज्यांच्या शिवाय आयपीएल अपूर्ण

[ad_1]

IPL 2022 : आयपीएलचा पंधरावा सीजन सुरु आहे. IPL 2022 मध्ये आतापर्यंत अनेक नवे खेळाडू भारतीय संघाला मिळाले आहेत. अनेकांनी आयपीएलमध्ये आपलं योगदान दिलं आहे. आयपीएलमध्ये यंदाचा सीजन काही खेळाडूंचा शेवटचा सीजन असू शकतो. जाणून घेऊया कोण आहेत ते खेळाडू.

1. एमएस धोनी

महेंद्रसिंह धोनी हा सर्वात दीर्घकाळापासून आयपीएल खेळणारा खेळाडू आहे. त्याची मैदानावरील उपस्थिती जबरदस्त असते. 224 आयपीएल सामन्यांचा भाग असलेल्या धोनीने 39.6 च्या जबरदस्त सरासरीने आणि 135.4 च्या स्ट्राइक रेटने 4838 धावा केल्या आहेत. 

2. दिनेश कार्तिक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा दिनेश कार्तिक चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने एकूण 217 सामने खेळले आहेत आणि 26.39 च्या जबरदस्त सरासरीने आणि 130 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 4143 धावा काढण्यात यश मिळवले आहे. आयपीएलमध्‍ये सर्वाधिक कॅच घेणाऱ्यांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकाचा यष्टिरक्षक देखील आहे.

3. ड्वेन ब्राव्हो

अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलमधील एक महत्त्वाचा खेळाडू आहे.  त्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूने 155 सामने खेळले आहेत, 22.74 च्या सरासरीने आणि 130.24 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने त्याने 1546 धावा केल्या आहेत. 8.37 च्या इकॉनॉमी रेटने 173 विकेट्स घेतल्या आहेत.

4. किरॉन पोलार्ड

वेस्ट इंडिजचा मसल-मॅन टी-20 क्रिकेटच्या इतिहासात नेहमीच आठवणीत राहिल. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने 182 सामन्यांत 149.46 च्या आश्चर्यकारक स्ट्राइक रेटने 3315 धावा केल्या आहेत.  त्याने 8.82 च्या इकॉनॉमी रेटने 66 विकेट्सही घेतल्या आहेत. आयपीएल 2022 हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो.

5 . शिखर धवन

शिखर धवनचे लक्ष 2022 च्या T20 विश्वचषकावर असेल. तो निश्चितपणे स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे आणि संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने 196 सामन्यांत 34.56 च्या सरासरीने आणि 126.69 चा स्ट्राइक रेट 5910 धावा केल्या आहेत. त्याने दोन शतके देखील झळकावली आहेत. आयपीएल 2022 हा धवनचा शेवटचा हंगाम असू शकतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *