IPL 2022 | मॅक्सवेलची ग्रँड एन्ट्री, पहिल्याच सामन्यात सुपरमॅन स्टाईलने केलं रनआऊट


पुणे :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 18 वा सामना (IPL 2022) आरसीबी (RCB) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येत आहे. आरसीबीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. आरसीबीच्या गोलंदाजांपुढे सूर्यकुमार यादवचा अपवाद वगळता मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले. आरसीबीच्या गोलंदाजांना त्यांच्या खेळाडूंनीही फिल्डिंगने चांगली साथ दिली. या मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) हवेत उडत मुंबईच्या बॅट्समनला रनआऊट केलं. मॅक्सवेलने रनआऊट केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  (ipl 2022 rcb vs mi royal challengers bangalore tilak varma was run out by glenn maxwell)

मॅक्सवेलने मुंबईचा युवा स्टार बॅट्समन तिलक वर्माला (Tialak Varma Run Out) शानदार पद्धतीने हवेत उडी घेत रनआऊट केलं. तिलकने सामन्यातील 9 व्या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मॅक्सवेलने नॉन स्ट्राईक एंडच्या दिशने धाव घेत हवेत उडत त्याला रनआऊट केला.  मॅक्सनेलच्या या चलाखीमुळे तिलकला भोपळाही फोडता आला नाही. 

आरसीबीला विजयासाठी 152 धावांचे आव्हान

दरम्यान सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले. मुबंईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सने गमावून 151 धावा केल्या.  सूर्यकुमारने सर्वाधिक 68 धावांची नाबाद खेळी केली.

आरसीबी प्लेइंग इलेव्हन :  फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, वनिंदु हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.  

मुंबई इंडियंसची ‘पलटण’ :  रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरोन पोलार्ड, रमनदीप सिंह, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी.  Source link

Leave a Reply