Headlines

IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीचं स्वप्न पूर्ण करणार 3 धडाकेबाज खेळाडू

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सामन्यांना आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. चेन्नई संघाची धुरा रवींद्र जडेजाकडे आहे. महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं असून ती जबाबदारी जडेजावर सोपवली आहे. 

महेंद्रसिंह धोनीनं आपल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीतील नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजय मिळवून दिला आहे. 2021 ची ट्रॉफी चेन्नईकडे होती. मुंबई संघाने सर्वात जास्तवेळा ट्रॉफी जिंकली आहे. आता चेन्नईला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकायची आहे. जे स्वप्न धोनीनं पाहिलं होतं ते आता जडेजा आणि धोनीचे हुकमी एक्के पूर्ण करणार आहेत. 
1. ऋतुराज गायकवाड
ऋतुराज गायकवाडची गेल्या वर्षीची कामगिरी पाहता चेन्नईनं त्याला रिटेन केलं. सर्वात स्फोटक फलंदाज म्हणून ऋतुराजकडे पाहिलं जातं. विरोधी टीमच्या बॉलचा धोबीपछाड करण्यात ऋतुराज माहीर आहे. आपल्या तुफान फलंदाजीने धावांचा पाऊस पाडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. 

2021 मध्ये ऋतुराजने आपल्या कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली. ऋतुराज गायकवाडने 14 सामन्यात 636 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक ठोकलं आहे. सर्वात जास्त धावा करणारा तो खेळाडू होता. 

2. रविंद्र जडेजा
चेन्नईचं कर्णधारपद जडेजाला देण्यात आलं आहे. त्याच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हीमध्ये त्याच्या कामगिरीची तोड नाही. त्याचा गोलंदाजीच्या जादूसमोर इतर फलंदाजांना घाम फुटतो. तो बॉल टोलवलाच तर कॅच आऊटची भिती असते. 

डेथ ओव्हर्समध्येही तो दमदार फलंदाजी करतो हे गेल्या आयपीएलमध्ये पाहायला मिळालं. मैदानातील त्याची हुशारी आणि चपळता संघासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते.

3. दीपक चाहर
यंदा सुरुवातीचे सामने जरी दीपक चाहर खेळणार नसला तरी चेन्नईसाठी तो हुकमी एक्का आहे. आपल्या उत्तम गोलंदाजीचा फायदा त्याने चेन्नई संघाला करून दिला आहे. त्याने 69 सामन्यात 59 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला बॉलिंगमुळे अनेक फलंदाजांना घाम फुटतो. चाहर, जडेजा आणि ऋतुराज हे त्रिकुट मिळून चेन्नईला ट्रॉफीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर करणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *