Headlines

IPL 2022 : दिग्गज क्रिकेटपटूने वर्तवलं भाकित, आयपीएलची ट्रॉफी ही टीम जिंकणार?

[ad_1]

IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अर्धा टप्पा आता जवळपास पूर्ण होत आला आहे. आयपीएलमधला प्रत्येक सामना चुरशीचा होत असून पॉईंटटेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रत्येक संघाचा प्रयत्न सुरु आहे. आयपीएलचं पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचं बाद फेरीतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. 

तर चार वेळा विजेत्या ठरलेल्या चेन्नईलाही बाद फेरीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार का याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.

कोणता संघ जिंकणार आयपीएल?
इंग्लंड (England) क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू मायकल वॉन (Michael Vaughan) याने यासंदर्भात मोठं भाकित वर्तवलं आहे. IPL 2022 मध्ये कोणता संघ विजेता ठरेल याची भविष्यवाणी त्याने केली आहे. 

मायकल वॉनची भविष्यवाणी
IPL 2022 चा विजेता म्हणून मायकल वॉनने विजेतेपदासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला (RCB) पंसती दिली आहे. फाफ डु प्लेसिसच्या (Faf Du Plessis) कामगिरीवर वॉन जबरदस्त खुश आहे. आरसीबीने या हंगामात सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पॉईंट टेबलमध्येही (Point Table)आरसीबी दुसऱ्या स्थानावर आहे. 

मायकेल वॉनचं ट्विट
आरसीबी संघाने काल रोमहर्षक लढतीत लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow super Giants) 18 धावांनी पराभव केला. यानंतर मायकेल वॉनने ट्विट केलं ‘डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी यंदा चांगली कामगिरी करेल यात शंका नाही. लखनऊला जिंकण्यासाठी आरसीबीने 182 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण लखनऊचा संघ 20 षटकांत केवळ 163 धावा करू शकला.

डु प्लेसिस आणि हॅजलवूडची कमाल
कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वेगवान गोलंदाज जोश हॅजलवूडच्या (Josh Hazlewood) दमदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीने मोठा विजय मिळवला. डु प्लेसिसने ६४ बॉलमध्ये ९६ धावा केल्या. यात ११ चौकार आणि २ सिक्स लगावले. मॅक्सवेलबरोबर (Glenn Maxwell) त्याने मोठी भागिदारी केली, जी विजयात निर्णायक ठरली. या कामगिरीच्या जोरावर डु प्लेसिस मॅन ऑफ द मॅचचा मानकरीही ठरला.

डु प्लेसिसच्या कामगिरीला जोड मिळाली ती आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हॅजलवूडची. हॅजलवूडने अवघ्या २५ धावात ४ विकेट घेतल्या.  हॅजलवूडच्या वेगवान गोलंदाजीसमोर लखनऊची बॅटिंग ढेपाळली. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *