IPL 2022 | केकेआरला मोठा झटका, हा खेळाडू आयपीएल 2022 मधून बाहेर


मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) शेवटी शेवटी अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) आणखी एक धक्का बसला आहे. पॅट कमिन्सनंतर (Pat Cummins) सलामीवीर अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) मागील सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती.  (ipl 2022 kkr ajinkya rahane ruled out due to hamstring injurey)

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, अजिंक्य रहाणेला ग्रेड III हॅमस्ट्रिंग दुखापत झाली आहे. रहाणे तो सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या बायबबलमधून बाहेर पडेल.  रहाणेने या आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 7 सामन्यांमध्ये 133 धावा केल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्याला मुकणार? 

रहाणे आता बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीत (NCA) आपल्या दुखापतीवर मेहनत घेणार आहे. रहाणे एनसीएमध्ये 4 आठवडे थांबणार आहे ,अशी माहिती  बीसीसीआयच्या सूत्रांनी क्रिकबझला दिली. 

रहाणेला दुखापत महागात?

टीम इंडिया लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात ही मागील दौऱ्यातील उर्वरित एका कसोटी सामन्याने होणार आहे.

टीम इंडिया 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेली होती. मात्र कोरोनामुळे या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. या उर्वरित सामन्याने भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. 

या उर्वरित सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 3 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार. हा दौरा 1 ते 17 जुलै दरम्यान पार पडणार आहे. रहाणेला या इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागू शकतं, असंही म्हटलं जात आहे.   Source link

Leave a Reply