IPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय


पुणे :  पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकाताला  विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022 kkr vs mi kolkata knight riders win by 5 wickets against mumbai indians pat cummins shine)

कोलकाताकडून पॅटने सर्वाधिक 15 चेंडूत 6 खणखणीत सिक्स आणि 4 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. तर वेंकटेश अय्यरने 41 बॉलमध्ये  6 फोर आणि 1 सिक्ससह 50 धावा केल्या. 

मुंबईकडून मुर्गन अश्विन आणि टिमाल मिल्स या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर डेनियल सॅम्सने एका फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.  

त्याआधी कोलकाताने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं.  मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. 

तिलक वर्माने नाबाद 38 धावा केल्या. तर डेवाल्ड ब्रेविसने 29 धावांचं योगदान दिलं. तसेच अखेरच्या चेंडूमध्ये कायरन पोलार्डने 22 धावांची वादळी खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी आणि उमेश यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डेनियल सॅम्स , डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टिमाल मिल्स आणि बासिल थम्पी. 

केकेआर प्लेइंग इलेव्हन :  श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर,  अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती. Source link

Leave a Reply