IPL 2022 | झहीरने सांगितलं मुंबईचं विजयी न होण्यामागचं कारण


मुंबई :  आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईला (Mumbai Indians) 15 व्या हंगामात (IPL 2022) सलग 4 सामन्यांचा पराभव करावा लागला आहे. मुंबईच्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजून संपलेली नाही. मुंबईच्या सातत्याने होणाऱ्या पराभवामुळे चाहत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र मुंबईचा क्रिकेट डायरेक्टर झहीर खानला (Zaheer Khan) आपल्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. मुंबई फक्त एक विजयापासून दूर आहे. तसेच पहिला विजयानंतर टीम ट्रॅकवर येईल, असा विश्वास झहीरने व्यक्त केला. (ipl 2022 mi zaheer khan explained why mumbai indians are not getting win in 15th season)

तसेच निर्णायक क्षणी टीम सतर्क नसल्याने पराभवाचा सामना करावा लागतोय, असंही झहीरने नमूद केलं. मुंबईला आरसीबीकडून 9 एप्रिलला झालेल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. याआधीच्या 3 मॅचमध्ये अनुक्रमे  दिल्ली, कोलकाता आणि राजस्थानने मुंबईला पराभूत केलं.

झहीर काय म्हणाला?

“आता साखळी फेरीतील 11 सामने बाकी आहेत. आम्हाला कमबॅक करावं लागेल. या स्पर्धेत अनेक संघ सलग जिंकल्याचं किंवा पराभूत होत असल्याचं पाहिलं असेल. आता विषय फक्त पहिल्या विजयाचा आहे. कधी कधी दबात्मक परिस्थितीत आपण स्वत:त्या क्षमतेवर शंका घेतो. त्यामुळे आम्हाला ही बाब लक्षात ठेवायला हवी. तसेच टीमला प्रेरणा द्यावी लागेल”, असं झहीर म्हणाला. झहीर बंगळुरु विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होता. 

“जे खेळाडू चांगली खेळी करतायेत, त्यांनी टीमला विजय मिळवून देण्याची गरज आहे. कारण हा विजय फार महत्तवपूर्ण असेल. आम्हाला आता सलग विजयी होण्याकडे लक्ष द्यावं लागेल. मात्र प्रत्येक दिवस आपला नसतो हे ही तितकंच खरंय”, असंही झहीरने नमूद केलं. 

मुंबईला सतर्क रहावं लागेल

“सामना जेव्हा प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकत असतो, तेव्हा टीमला सतर्क रहायला हवा. मात्र आम्ही एक टीम म्हणून असं करु शकलो नाहीत. त्यामुळे या गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला हवं”, असं झॅक म्हणाला. दरम्यान या मोसमातील मुंबईचा पुढील सामना हा 13 एप्रिलला पंजाब किंग्स विरुद्ध खेळवण्यात येणार आहे. Source link

Leave a Reply