Headlines

IPL 2022 | आयपीएलमध्ये या घातक गोलंदाजांची एन्ट्री, या टीमची चांदी

[ad_1]

मुंबई : सर्व क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं (IPL 2022) वेध लागंलंय. यंदाच्या मोसमापासून पुन्हा एकदा आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. या मोसमाला सुरुवात होण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, आयपीएलच्या तयारीसाठी जगातील सर्वात घातक गोलंदाज भारतात पोहोचला आहे. (ipl 2022 srh dale styen come india join to sunrisers hyderbad fast bowling coach) 

कोण आहे तो बॉलर?

आयपीएलच्या 15 व्या मोसमाला 26 मार्चपासून सुरूवात होतेय. या 15 व्या मोसमासाठी सनरायझर्स हैदराबादचा बॉलिंग कोच म्हणून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन गुरुवारी भारतात आला. 

डेल स्टेनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्ती घेतली होती. आता स्टेन हैदराबादच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होईल ज्यात हेड कोच टॉम मूडी, बॅटिंग कोच ब्रायन लारा आणि बॉलिंग कोच मुथय्या मुरलीधरन यांचा समावेश आहे.

स्टेनची पहिली प्रतिक्रिया

स्टेनने आयपीएलमध्ये 95 सामन्यात 97 विकेट घेतल्या आहेत. फ्रँचायझीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला, ‘होय, मी परतल्यानंतर खूप आनंदी आहे. मी काही काळ भारतात राहिलो आहे, त्यामुळे मी परत येण्यासाठी खूप उत्सुक आहे”, असं स्टेन म्हणाला. 

स्टेनची क्रिकेट कारकिर्द

स्टेनने 93 कसोटीत 22.95 च्या सरासरीने 439 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 125 एकदिवसीय सामन्यांमध्ये 196 विकेट्स आणि 47 टी20 मध्ये 64 विकेट्स घेतल्या आहेत. 

स्टेनने डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रतिनिधित्व करताना 95 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 97 विकेट घेतल्या आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *