Headlines

IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या 1 दिवसाआधी मोठा वाद, नक्की काय झालं?

[ad_1]

मुंबई : आता आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022)  अवघे काही तास उरले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात या मोसमातील सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात आयोजन हे  वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलं आहे. मात्र या स्पर्धेच्या अवघ्या काही तासांआधी मोठ्या वादाला तोंड फुटलंय. (ipl 2022 big controversy before 1 day of 15th season sanju samson angry over to memes rajasthan royals announced to change our social media team)

नक्की काय झालं? 

राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडिया पेजवरुन कॅप्टन संजू सॅमसनबद्दल एक मीम शेअर करण्यात आला. संजुला हा मीम काही पटला नाही. यानंतर संजुने ट्विटद्वारे टीमला व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला.

या सर्व ट्विटनंतर राजस्थान रॉयल्स टीमने हे मीम डिलीट केलं. यानंतर राजस्थानकडून एक निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनावद्वारे राजस्थानने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच राजस्थानने सोशल मीडिया टीममध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.  

निवेदनात काय म्हटलय?

“आजची घटना लक्षात घेऊन आम्ही सोशल मीडिया टीम आणि दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतलाय. संघात सर्व काही आलबेल आहे. आम्ही हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहोत. टीम मॅनेजमेंट डिजीटल स्ट्रेटजीवर लक्ष देईल. तसेच नवी टीम नियुक्त करेल”, असं या निवेदनात म्हटलय. 

राजस्थान रॉयल्सने मेगा ऑक्शनआधी सॅमसनसह तीन खेळाडूंना रिटेन केलं. त्यानंतर राजस्थानने मेगा लिलावातून शिमरॉन हेटमायर, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि रविचंद्रन अश्विन यांसारख्या मोठ्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं. दरम्यान राजस्थान या मोसमातील पहिला सामना हा हैदराबाद विरुद्घ 29 मार्चला खेळणार आहे. 

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *