IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात रोहितसोबत हा स्टार खेळाडू ओपनिंग करणार


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) आता 100 तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या मोसमापासून  संघ आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स (MUMBAI INDIANS) आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी टीम राहिली आहे.  मुंबईने सर्वाधिक वेळा चॅम्पियन राहिली आहे. मुंबईने या 15 व्या मोसमाआधी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा (ROHIT SHARMA) आणि बॅटिंग कोच महिला जयवर्धने (MAHELA JAYWARDHANE) उपस्थित होते. या दरम्यान रोहितने त्याच्यासोबत ओपनिंगला कोण खेळणार याबाबत माहिती दिली. तसेच अनेक प्रश्नाची उत्तरं दिली. (ipl 2022 mi mumbai indians captain rohit sharma wll opening with ishan kishan will 15th season)

रोहितसोबत एक युवा आणि आक्रमक खेळाडू ओपनिंग करणार आहे. या खेळाडूने याआधी अनेकदा टीम इंडियाकडून रोहितसोबत सलामी केली आहे. रोहित आणि हा युवा खेळाडू या दोघांची  जोडी जबरदस्त आहे. रोहितसोबत इशान किशन (ISHAN KISHAN) ओपनिंग करणार आहे. मुंबईने इंडियन्सने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  इशानने याआधीही मुंबईसाठी सलामी केली आहे. 

मुंबई इंडियन्स टीम 2022 |  रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, देवाल्ड ब्रेविस, राहुल बुद्धि, ईशान किशन, आर्यन जुयाली, कीरोन पोलार्ड, संजय यादव, डेनियल सॅम्स, टिम डेविड, रमनदीप सिंह, रितिक शुकेन, अर्जुन तेंडुलकर, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, टाइमल मिल्स, रिले मेरिडिथ, मोहम्मद अरशद खान, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन आणि बासिल थंपी. Source link

Leave a Reply