IPL 2022 | आयपीएलच्या 15 व्या मोसमात हा रेकॉर्ड ब्रेक फक्त धोनीच करु शकतो


मुंबई : आयपीएल च्या 15 व्या मोसमाची सुरुवात (IPL 2022) 26 मार्चपासून  होत आहे. या हंगामात 10 संघ सहभागी होणार आहेत. या मोसमात अनेक युवा खेळाडू मैदानावर दिसणार आहेत, तर अनेक खेळाडू खूप अनुभवी देखील आहेत. चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) नेतृत्वाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) आहे. यावेळी धोनीला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. यासाठी धोनीला शतक झळकावण्याची गरज आहे. (ipl 2022 adam gilchrist oldest player to score an century csk captain ms dhoni has chance to break record)

धोनीने शतक झळकावल्यास तो आयपीएलमध्ये शतक ठोकणारा वयस्कर फलंदाज ठरेल. तसेच धोनी एडम गिलख्रिस्टचाही रेकॉर्ड ब्रेक करेल.  

सर्वात जास्त वयात शतक ठोकण्याचा विक्रम हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टच्या (Adam Gilchrist) नावावर आहे. गिलख्रिस्टने वयाच्या 39 वर्ष  184 व्या दिवशी हा कारनामा केला होता.  तर श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याने (Adam Gilchrist)  38 वर्ष 319 दिवशी सेंच्युरी केली होती. 

सचिन चौथ्या क्रमांकावर 

आयपीएलमध्ये ख्रिस गेल  (Chris Gayle) सर्वात जास्त वयात शतक ठोकण्याच्या बाबतीत  तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने वयाच्या 38 वर्षे 210 व्या दिवशी हा कारनामा केला होता. तर सचिनने (Sachin Tendulkar) वयाच्या 37 वर्षे 356 व्या दिवशी शतक ठोकलेलं.  
 
धोनी करणार का हा कारनामा? 

धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नईला 4 वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून दिलंय. धोनी आतापर्यंत 220 आयपीएल सामने खेळला आहे. धोनीने या लीगमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याच्या नावावर 23 अर्धशतकांची नोंद आहे. धोनीने 193 डावात 4 हजार 746 धावा केल्या आहेत. धोनीची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 84 आहे.

त्यामुळे धोनीकडे या मोसमात पहिलवहिलं शतक ठोकत रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. धोनी गेल्या 2 मोसमापासून अपयशी ठरतोय. त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे धोनी या मोसमात धावांचा वनवास संपवत शतक ठोकून रेकॉर्ड ब्रेक करणार का, याकडे चाहत्याचं लक्ष असणार आहे.  Source link

Leave a Reply