IPL 2022 : हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही?


मुंबई : IPL 2022 चा 15 वा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या दरम्यान टीम इंडियासाठी आणि गुजरातसाठी आनंदाची बातमी आहे. हार्दिक पांड्याची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे तो पुन्हा फॉर्ममध्ये मैदानात परतताना दिसणार आहे. 

गेल्या 2 वर्षात हार्दिक पांड्याने पाठीच्या दुखण्यामुळे गोलंदाजी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याला ऑलराऊंडर का म्हणायचं अशी टीका अनेकांनी केली होती. आता हार्दिक पांड्या पुन्हा मैदानात फलंदाजीसोबत गोलंदाजी करण्यासाठी उतरणार की नाही असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. 

पाठीच्या सर्जरीनंतर पांड्याने गोलंदाजीपासून आराम घेतला होता. पुन्हा गोलंदाजी कधी सुरू करणार असा प्रश्न हार्दिक पांड्यला विचारला तेव्हा तो म्हणाला की हे सगळ्यांसाठी सरप्राइज असणार आहे. 

गुजरातच्या जर्सी लॉन्चिंग सोहळ्यात पांड्याने याबाबत सांगितलं. मी मैदानात पुन्हा गोलंदाजी करताना दिसणं हे सर्वांसाठी एक खास सरप्राईज असणार आहे. त्यामुळे ते सरप्राइज तसंच राहुद्या असं पांड्या म्हणाला.

आयपीएल स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसणार आहे का? याची उत्सुकता वाढली आहे. पांड्याच्या या वक्तव्यानंतर आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे. पांड्यावर गेल्या काही महिन्यांपासून फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यामुळे पांड्याने काही वेळ ब्रेक मागितला होता. आता तो पुन्हा आयपीएलपासून मैदाना खेळताना दिसणार आहे. 

हार्दिक पांड्याला गुजरात फ्रान्चायझीने 15 कोटी रुपये देऊन आपल्या संघात घेतलं. संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिकवर आहे. हार्दिकचं करियर चांगलं राहिलं आहे. 92 सामन्यांमध्ये त्याने 42 विकेट्स घेऊन 1476 धावा केल्या आहेत. त्याने 4 अर्धशतक ठोकले आहेत. त्याने एका डावात सर्वाधिक म्हणजे 91 धावा केल्या होत्या.

आयपीएल स्पर्धा 26 मार्चपासून खेळवण्यात येत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पहिला सामना होणार आहे. यंदा 10 संघांमध्ये 70 सामने होणार आहेत. मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणांवर हे सामने पार पडणार आहेत. 29 मे रोजी शेवटचा सामना खेळवण्यात येईल. Source link

Leave a Reply