Headlines

IPL 2022 | Delhi Capitals मध्ये लवकरच घातक गोलंदाजाची एन्ट्री

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL 2022) दिल्ली कॅपिट्ल्ससाठी (Delhi Capitals) गूड न्यूज मिळाली आहे. आयपीएल सुरु होण्याआधी 26 परदेशी खेळाडू स्पर्धेच्या पहिल्या आठड्यात खेळताना दिसणार नाहीत, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता या खेळाडूंची संख्या कमी होणार आहे. यामुळे सर्वाधिक फायदा हा दिल्ली टीमला होणार आहे, कारण त्यांच्या गोटात एका घातक गोलंदाजाची एन्ट्री होणार आहे. हा खेळाडू प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.  (ipl 2022 south africa bowler lungi ngidi delhi capitals rishabh pant)

या गोलंदाजाची एन्ट्री

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात आजपासून (18 मार्च) कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. मात्र या मालिकेत आफ्रिका आपल्या मुख्य गोलंदाजाशिवाय खेळणार आहे. ज्याचा फायदा हा दिल्ली कॅपिट्ल्सला होणार आहे. लुंगी एन्गिडीला दिल्लीने करारबद्ध केलंय.   
एन्गिडी हा दिल्लीचा प्रमुख भाग आहे.  

मात्र दुसऱ्या बाजूला आफ्रिकेचा एनरिक नॉर्खियाच्या आयपीएल सहभागाबाबत अजूनही चित्र स्पष्ट नाही. नॉर्खियाची बांगलादेश विरुद्घच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाही. तसेच तो आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या काही सामन्यातही तो दिसणार नाही.

आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. “आम्ही आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देऊ, असा बीसीसीआयसोबत करार झाला होता.  मात्र आयपीएल विन्डो बंद झालीय. मात्र आमच्यातील करार कायम आहे”, अशी माहिती एका अधिकाऱ्याने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिली.  

अशी आहे दिल्ली कॅपिट्ल्सची टीम :

ऋषभ पंत (कॅप्टन), अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया, शार्दुल ठाकुर, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेबर, डेविड वॉर्नर, कमलेश नागरकोटी, सरफराज खान, मिचेल मार्श, केएस भरत, मनदीप सिंह, खलील अहमद, चेतन सकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमैन पॉवेल, प्रवीण दुबे,लुंगी नगिडी, टीम सायफर्ट आणि विकी ओस्तवाल.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *