IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय. यामुळे या स्पर्धेतील थरार आणि रंगत आणखी वाढणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईच्या टीममध्ये घातक गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे, ज्यामुळे इतर संघांची पाचावर धारण बसली आहे. हा खेळाडू भेदक बॉलिंगसाठी ओळखला जातो. (ipl 2022 ireland pacer josh little join chennai super kings squad as a net bolwer)

चेन्नईच्या गोटात आयर्लंडच्या लेफ्ट आर्म बॉलर जोश लिटीलची (Josh Little) एन्ट्री झाली आहे. जोशचा टीममध्ये नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आला आहे. आयपीएलमधील क्वचित टीमकडे लेफ्ट आर्म स्पीनर आहेत. 

चेन्नई नेहमीच प्रत्येक मोसमात युवा खेळाडूंना संधी देतं. चेन्नईने गेल्या 14 व्या मोसमात अफगाणिस्तानच्या फजल फारुकीला नेट बॉलर म्हणून संधी दिली होती.  

सध्या चेन्नईची टीम सूरतमधेय कसून सराव करतेय. चेन्नईचा या मोसमातील पहिला सामना हा  26 मार्चला कोलकाता विरुद्ध आहे. संघात हा भेदक गोलंदाज आल्याने ‘जोश’ वाढला आहे. जोशला सीएसकेमध्ये संधी मिळाल्याने आयर्लंड क्रिकेटने त्याचं ट्विटद्वारे कौतुक केलंय.    

चेन्नई सुपर किंग्स टीम : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मोईन अली, रुतुराज गायकवाड, रवींद्र जाडेजा, अंबाती रायुडू, ड्व्हेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दूबे, महेश थीक्षाना, राजवर्धन हंगरगेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरि निशांत, एन जगदीशन, क्रिस जॉर्डन आणि के भगत वर्मा.Source link

Leave a Reply