Headlines

IPL 2022, CSK | “आता चेन्नई आधीसारखी टीम राहिली नाही”

[ad_1]

मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (Mahednra Singh Dhoni) आणि चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) एक वेगळं आणि खास असं नातं आहे.  धोनीने आयपीएलच्या 15 व्या मोसमाआधी (IPL  2022) सुरू होण्यापूर्वी कॅप्ट्न्सी सोडली. आता रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) चेन्नईची कॅप्ट्न्सी करणार आहे. (ipl 2022 now chennai super kings is not the same team as before says team india former opener batsman virender sehwag) 

धोनीच्या कॅप्टन्सीशिवाय चेन्नई टीमची कल्पनाही करवत नाही. धोनीने कॅप्टन्सी सोडल्यानंतर आता चेन्नईची टीम धोनीच्या नेतृत्वात होती तशीच नसेल, अशी नक्कीच शंका अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात आली असेल. याबाबत टीम इंडियाचा माजी आक्रमक ओपनर वीरेंद्र सेहवागनेही  (Virender Sehwag) अशीच काहीशी शंका उपस्थित केलीय. धोनीच्या नेतृत्वात आधी चेन्नई टीम जशी होती, आता तशी नसेल, असं मत सेहवागने व्यक्त केलंय. 

जाडेजा नामधारी  कॅप्टन, धोनीच सर्व सांभाळणार

“मी आधी काही व्हीडिओ शेअर करत म्हटलं होतं की, जेव्हा अनुभवाबाबत म्हटलं जातं तेव्हा तुम्ही धोनीकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. मात्र यावेळेस दुर्लक्ष करावं लागेल, कारण यंदा धोनी कॅप्टन नाही. तसेच धोनी कॅप्टन नसल्याने आता चेन्नई तशी खेळणार नाही. मात्र धोनी मैदानात असेल”, असं सेहवागने स्पष्ट केलं. तो क्रिकबझसह बोलत होता. 

“विराट कोहली वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन झाला. मात्र तेव्हा टीम इंडिया तशी नव्हती जशी धोनीच्या नेतृत्वात होती. जाडेजा नामधारी कॅप्टन असू शकतो तर कर्णधारपदाची जबाबदारी धोनी सांभाळेल. जाडेजाला कॅप्टन्सीचा अनुभव मिळावा, यासाठी हा असा प्रयत्न असू शकतो. कारण, धोनी कदाचित पुढील हंगामात खेळताना दिसणारही नाही. त्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे” असंही सेहवागने नमूद केलं.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *