IPL 2022: क्रिकेटवेड्या चाहत्याकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा, BCCI मान्यता देणार का ?


मुंबई : देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर सुरु आहे. आयपीएलनंतर टी-२० विश्वचषक, आशिया चषक अशा विविध स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यांपूर्वी क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वर्ल्ड कपच्या टीमच्या सिलेंक्शनवर लागलेय.

मात्र या सर्वांत वर्ल्ड कपची टीम निवडून एक चाहता आयपीएलच्या मैदानात उतरला. या संदर्भातला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाहत्याने निवडलेल्या टीमला बीसीसीआय मान्यता देणार का ?  हे आता पहावे लागणार आहे.  

आयपीएलच्या मैदानात बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्स (RR) संघात सामना पार पडला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने 8 गडी राखून विजय मिळवला.
या सामन्यात एक चाहता पोस्टरवर वर्ल्ड कप टीम सिलेक्ट करून घेऊन आलेला.  त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोवर आता तूफान कमेंटस आणि लाईक्स मिळतायत. 

 या खेळाडूंना टीममध्ये स्थान
चाहत्याने रोहित शर्माला आपल्या टीममध्ये कॅप्टन केलं आहे तर दिनेश कार्तिक वाईस कॅप्टन आहे. यासोबत विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव,  हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक,

युझवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, राहुल तेओतिया, ऋषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान देण्यात आले. 

ट्रिपल डोस 

क्रिकेट चाहत्यांसाठी यावर्षी ट्रिपल डोस आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 आता सुरू आहे. यानंतर वर्षाच्या शेवटी टी-२० विश्वचषकही ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे.

यादरम्यान आशिया चषकही असणार आहे.ज्यामध्ये भारत-पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.Source link

Leave a Reply