Headlines

IPL 2022 | कॅप्टन जाडेजा मोसमातील पहिल्या सामन्यासाठी कोणाला संधी देणार? अशी असू शकते चेन्नईची टीम

[ad_1]

मुंबई  : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) सुरुवातीसाठी आता अवघे काही तास उरले आहेत. या मोसमातील पहिला सामना शनिवारी संध्याकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन कशी असेल ते जाणून घेऊयात. (ipl 2022 match 1 csk vs kkr chennai super kings predict playing eleven see player list) 
 
ऋतुराजसोबत कोण करणार ओपनिंग?

कोलकाता विरुद्धच्या या सामन्यात इंग्लंडचा ऑलराउंडर मोईन अली उपलब्ध नाहीये. त्यामुळे चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj Gaikwad) ओपनिंग कोण करणार, असा सवाल वांरवार उपस्थित केला जात होता. दरम्यान ऋतुराजसोबत न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) ओपनिंग करु शकतो. तर तिसऱ्या स्थानी रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) खेळण्याची शक्यता आहे.  

अशी असेल मीडल ऑर्डर

मोईन अलीच्या अनुपस्थितीमुळे चेन्नईचा नवा कर्णधार रवींद्र जडेजा याच्यासाठी मधल्या फळीत कोणाला खेळवायचं ही चिंता सतावतेय.  मात्र, यावेळी स्वत: जाडेजा वर खेळू शकतो. जाडेजा नुकत्यावेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेत टीम इंडियासाठी चौथ्या स्थानी खेळला होता.  

अंबाती रायडू चौथ्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर खेळेल अशी अपेक्षा आहे. यानंतर एमएस धोनी, शिवम दुबे आणि ड्वेन ब्राव्हो खेळताना दिसणार आहेत.
 
बॉलिंग लाईनअप

बॉलिंगची जबाबदारी ही मिचेन सँटनर, राजवर्धन हंगरगेकर आणि एडम मिल्नेकडे असेल. तसेच त्यांच्या सोबतीला स्वत: कॅप्टन जाडेजा, ड्वेन ब्राव्हो आणि शिवम दुबे यांची साथ असेल. मात्र काही सामन्यांमध्ये चेन्नईला दीपक चाहरची उणीव भासेल.  

चेन्नई सुपर किंग्सची संभावित प्लेइंग इलेव्हन : डेवोन कॉन्वे, रुतुराज गायकवाड़, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा (कप्तान), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्रावो, मिचेल सैंटनर, राजवर्धन हंगरगेकर और एडम मिल्ने.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *