IPL 2022: अमेरिकन पॉर्न स्टार आयपीएलची चाहती, या खेळाडूच्या प्रेमात


IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 सुरूवात झाली असून सर्व संघ आपापले पहिले सामने खेळले आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात आयपीएलची क्रेझ आहे. पहिल्या काही सामन्यातच अनेक खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. तर काही खेळाडूंना अजूनही सूर सापडलेला नाही. 

पण सध्या एका खेळाडूची मात्र चांगलीच चर्चा होत आहे आणि याला कारणही तसंच आहे. चक्क अमेरिकन पॉर्न स्टार केंड्रा लस्ट (Kendra Lust) या खेळाडूच्या प्रेमात आहे. आणि हा खेळाडू आहे गुजरात टायटन्सचा (Gujrat Titens) गोलंदाज मोहम्मद शमी. (mohammed shami)

केंड्रा लस्टने ट्विट करून गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहम्मद शमीचे कौतुक केलं आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर केंद्र लस्टने मोहम्मद शमीचे कौतुक करणारे ट्विट केले होते, जे व्हायरल झालं आहे.

केंड्रा लस्ट हिच्या ट्विटनंतर अनेक प्रकारचे मीम्स बनवले गेले असून त्याचा ट्रेंड सुरू झाला. विशेष म्हणजे केंड्रा लस्टने अनेक मीम्स, लेख, व्हिडिओ रिट्विटही केले आहेत.

बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला पाठिंबा
केंद्र लस्टने याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी (RCB) ट्विट करत विराट कोहलीच्या टीम बेंगळुरूला सपोर्ट केला होता. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत आरसीबीने एक सामना जिंकला आहे तर एक सामना गमावला आहे.

केंद्र लस्ट 43 वर्षांचा असून ती अमेरिकन पॉर्न स्टार आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. इंस्टाग्रामवर केंड्रा लस्टचे 7.8 लाख फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवरही लाखो फॉलोअर्स आहेत.

इंडियन प्रीमियर लीगच्या चाहत्यांमध्ये अनेक स्टार्सचा समावेश आहे. आयपीएल दरम्यान, वेगवेगळ्या क्षेत्रातील स्टार्सचे ट्विट, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत असतात ज्यावर मीम बनवले जातात.Source link

Leave a Reply