IPL 2022 : नवे कर्णधार नवा जोश! पंजाब विरुद्ध बंगळुरू काय सांगतात Head to Head रेकॉर्ड्स


मुंबई : आयपीएलमधील तिसरा आणि लक्ष असणारा सामना म्हणजे बंगळुरू संघाचा. मुंबई विरुद्ध दिल्ली पाठोपाठ आज पंजाब विरुद्ध बंगळुरू सामना होत आहे. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल तर बंगळुरूचा नवा कर्णधार फाफ डु प्लेसिस आहे. दोन नवे कर्णधार नव्या टीम आणि जोशासह मैदानात उतरणार आहेत. पंजाबचा संघ संपूर्ण नवा असणार आहे. त्यामुळे यंदा कोण कोणावर भारी पडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. सामन्याआधी हेड टू हेडचे आकडे काय सांगतात जाणून घेऊया. 

आजपर्यंत पंजाब विरुद्ध बंगळुरू 28 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. त्यापैकी 13 सामने बंगळुरू संघाने जिंकले आहेत. तर 15 सामने पंजाब संघाने जिंकले आहेत. याचा अर्थ दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. 

पंजाब संघाने दोन खेळाडू रिटेन केले आहेत. उर्वरित संघात सगळे नवे खेळाडू असणार आहेत. तर के एल राहुल ऐवजी कर्णधारपदाची धुरा आता मयंक अग्रवालच्या खांद्यावर असणार आहे. मयंक अग्रवाल आणि शिखर धवन ओपनिंगला उतरू शकतात. दोघंही उत्तम कसलेले फलंदाज आहेत. 

लियाम लिविंगस्टोन मधल्या फळीमध्ये उतरण्याची शक्यता आहे. शाहरुख खान आणि ओडिन स्मिथ सारखे जबरदस्त फिनिशर आहेत. त्यामुळे यावेळी पंजाब संघ मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

बंगळुरू संघाकडे हर्षल पटेल, मोहम्मद, डेव्हिडसारखे घातक बॉलर्स आहेत. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिससारखे फलंदाज आहेत. दिनेश कार्तिकची बॅट चांगल्या फॉर्ममध्ये चालली धावांचा पाऊस पडेल. आता पंजाब पुन्हा बंगळुरूवर भारी पडणार की बंगळुरूचे गोलंदाज पंजाबला पुन्हा तंबुत पाठवणार हे पाहावं लागणार आहे. 

पहिल्या सामन्यातून हे खेळाडू बाहेर

बंगळुरू संघातील 3 खेळाडू सुरुवातीचे सामने खेळणार नाहीत. ग्लॅन मॅक्सवेलनं नुकतंच लग्न केलं आहे. त्यामुळे तो पहिले काही सामने खेळणार नाही. तर जोश हेजलवुड आणि  बेहरेनडॉर्फ सुरुवातीच्या सामन्यांना खेळणार नाहीत अशी माहिती मिळाली आहे. पंजाब किंग्समध्ये कगिसो कबाडा क्वारंटाइनमुळे पहिला सामना खेळणार नाही. 

बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेव्हन-  मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, प्रभसिमरन सिंह/जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टोन, शाहरुख खान, भानुका राजपक्षे, ओडेन स्मिथ, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, राहुल चाहर आणि संदीप शर्मा.

पंजाब संभाव्य प्लेइंग इलेव्हन –  फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, डेविड विली आणि मोहम्मद सिराज.Source link

Leave a Reply