IPL 2022 | 8 बॅट्समन शून्यावर आऊट, 17 कोटींच्या खेळाडूचाही समावेश


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली आहे. संजू सॅमसनने धमाकेदार बॅटिंग केलीय. तर दीपक हड्डाची चौफेर फटकेबाजीही क्रिकेट चाहत्यांनी अनुभवलीय. मात्र दुसऱ्या बाजूला दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना भोपळाही फोडता आलेला नाही. यामध्ये महागड्या खेळाडूंचाही समावेश आहे. (ipl 2022 8 player out on duck in total 1st five matches with k l rahul shubaman gill see list)

आतापर्यंत 15 व्या मोसमात एकूण 8 फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत. या 8 बॅट्सनमध्ये 17 कोटी रुपयांच्या खेळाडूचाही समावेश आहे. 

या मोसमात 2 फलंदाज हे पहिल्याच बॉलवर (Golden Duck) आऊट झाले आहेत. लखनऊ सुपरजायंट्सचा कॅप्टन केएल राहुल हा गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता.    

पंजाब किंग्सचा बॅट्समन राजा बावा आरसीबी विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाला. 

चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार ओपनर ऋुतुराज गायकवाड केकेआर विरुद्ध चौथ्याच बॉलवर भोपळा न फोडता आऊट झाला. दिल्ली कॅपिट्ल्सच्या 2 खेळाडूंवर शून्यावर बाद होण्याची वेळ ओढावली. 

यामध्ये मनदीप सिंह आणि रोवमॅन पॉवेल हे दोघे मुंबई विरुद्धच्या सामन्यात  शून्यावर आऊट झाले. 

गुजरात टायटन्सचा ओपनर शुबमन गिल लखनऊ विरुद्धच्या मॅचमध्ये झिरोवर तंबूत परतला. तर सनरायजर्स हैदराबादचे निकोलस पूरन आणि राहुल त्रिपाठी राजस्थान रॉयल्स विरुद्ध झिरोवर बाद झाले.Source link

Leave a Reply