Headlines

IPL 2022 | मुंबईच्या गोलंदाजाचा भेदक मारा, चेन्नईचा अर्धा संघ तंबूत

[ad_1]

मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 59 वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSK vs MI) यांच्यात खेळवण्यात येतोय. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगलसाठी भाग पाडलंय. बॅटिंगसाठी आलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर शरणागती पत्कारली आहे. मुंबईच्या गोलंदाजांनी पावर प्लेच्याआधीच चेन्नईचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. (csk vs mi ipl 2022 chennai super kings lost 5 wickets in power play against mumbai indians daniel sams shine)

मुंबईने पहिल्याच ओव्हरमध्ये चेन्नईला 2 धक्के दिले. गेल्या काही सामन्यांपासून धमाका करत असलेल्या डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली या दोघांना डॅनियल सॅम्सने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे सॅम्सने या दोघांना भोपळाही फोडू दिला नाही. 

यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने रॉबिन उथप्पला अवघ्या 1 धावेवर एलबीडबल्यू केलं. 

डॅनियलने सामन्यातील  पाचव्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर ऋतुराज गायकवाडला विकेटकीपर इशान किशनच्या हाती कॅच आऊट केलं. गायकवाडने 7 धावा केल्या. यानंतर रिले मेरिडिथने अंबाती रायुडूला 10 रन्सवर असताना कॅच आऊट केलं. 

चेन्नईसाठी ‘करो या मरो’चा सामना 

दरम्यान प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत मुंबई विरुद्धच्या सामना जिंकणं बंधनकारक आहे. तर मुंबई आधीच बाहेर पडली आहे. त्यामुळे चेन्नईला स्पर्धेत कायम राहण्यासाठी विजय मिळवावाच लागणार आहे.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रमनदीप सिंह, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेविड, डेनियल सॅम्स, ऋतिक शौकीन, जसप्रीत बुमराह, रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेय. 

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉनवे, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), मोईन अली, ड्वेन ब्रावो, मुकेश चौधरी, महेश थीक्षाना आणि  सिमरजीत सिंह. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *