Headlines

IPL 2022| 2 स्टार खेळाडूंचं करिअर धोक्यात, पुढच्या हंगामात एन्ट्री मिळणं कठीण

[ad_1]

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अत्यंत वाईट कामगिरी काही खेळाडूंनी केली. 2 खेळाडू आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणंही कठीण आहे. त्यांना पुढच्या हंगामात बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

पंधराव्या हंगामात गुजरात आणि राजस्थानने दमदार कामगिरी केली. या दोन टीममध्ये फायनल सामना होणार आहे. लखनऊ आणि गुजरात टीमने प्रस्थापित टीमचा बाजार उठवला. 4 आणि 5 ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या टीमना या दोन्ही टीमने धूळ चारली. यंदाचा हंगाम सगळ्या अर्थानं वेगळा ठरला. 

अनेक युवा खेळाडूंची उत्तम कामगिरी पाहायला मिळाली. पण दोन खेळाडू सुपर फ्लॉप ठरले. ज्यांना पुढच्या सामन्यात संधी मिळणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

1. विजय शंकर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या ऑलराउंडर विजय शंकरची टीम इंडियापाठोपाठ आता आयपीएलमध्ये अत्यंत वाईट कामगिरी ठरली आहे. आयपीएलमध्ये 2022 मध्ये निराशाजनक कामगिरीचा फटका टीमलाही बसला आहे. 

विजयच्या सतत फ्लॉप शोमुळे गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला ड्रॉप करण्यात आलं. विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र फ्रान्चायझीने दाखवलेल्या विश्वास खरा उतरण्यात तो कमी पडला. 

आयपीएल 2022 मध्ये त्याने एकूण 4 सामने खेळून 19 धावा केल्या. पुढच्या वर्षी विजय शंकरला आयपीएलसाठी त्याच्या या चुकीमुळे अनसोल्ड राहण्याची वेळ ओढवू शकते. 

2, मनदीप सिंह

दिल्लीने मनदीप सिंहला आपल्या टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकला नाही. IPL 2022 मध्ये मनदीप सिंह पूर्ण फ्लॉप ठरला. त्यामुळे दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमधून त्याला ड्रॉप केलं. 

त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये चांगली कामगिरी करून स्थान पक्क करण्याची आयती संधी मिळाली होती. मात्र तरीही तो फ्लॉप ठरला. ज्यामुळे दिल्ली मॅनेजमेंट त्याच्यावर नाराज आहे. दिल्ली त्याला रिलीज करू शकतं. याशिवाय त्याचा वाईट फॉर्म पाहता त्याला पुन्हा संधी दिली जाईल याची शक्यता कमीच आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *