Headlines

IPL 2022 : 2.40 कोटींच्या खेळाडूचा कारनामा, थेट बॉलच गायब

[ad_1]

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये युवा खेळाडूंनी धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या हंगामात चौकार आणि षटकारांची बरसात चाहत्यांना पाहायला मिळाली. राजस्थान विरुद्ध बंगळुरू झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने चांगली कामगिरी केली. 

युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने 103 मीटर लांब सिक्स ठोकला. हा बॉल स्टेडियम बाहेर गेला. तो बॉल शोधताना हैराण झाले. खेळ थांबू नये म्हणून अंपायरने दुसरा बॉल आणून दिला. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने आपल्या षटकारांनी चाहत्यांची मनं जिंकून घेतली. 

यशस्वी जयस्वालचा 103 मीटर लांब सिक्स ठोकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचं क्रिकेटप्रेमींकडून खूप कौतुक होत आहे. अंपायला दुसरा बॉल देण्याची वेळ आली. त्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यशस्वी जयस्वालचं कौतुकही खूप होत आहे. 

आयपीएल 2022 पंधराव्या हंगामात पंजाबचा लियाम लिविंगस्टोनने गुजरात टाइटंस विरुद्धच्या सामन्यात 117 मीटर लांब षटकार ठोकला होता. त्यानंतर मुंबईच्या  डेवाल्ड ब्रेविसने 112 मीटर लांब षटकार लगावला होता. आता जयस्वालची चर्चा होत आहे. 

या सामन्यात यशस्वी जयस्वालने 29 बॉलमध्ये 41 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला आणि राजस्थानला विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत IPL 2022 मध्ये 6 सामन्यात 25.50 च्या सरासरीने 153 धावा केल्या.

यशस्वी जयस्वालला 2020 मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. आयपीएल 2021 मध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती. त्याने 10 सामन्यांत 24.90 च्या सरासरीने 249 धावा केल्या होत्या.

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *