इंटरनेटची स्पीड होईल कमी, चुकूनही सिम सोबत या चुका करू नका


नवी दिल्लीः Jio ने नुकतीच High Speed 5G Internet ची घोषणा केली होती. अनेक शहरात जिओच्या ५जीची सुरुवात झाली आहे. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा काही पद्धत संबंध माहिती देत आहोत ज्याने इंटरनेट स्पीड कमी होवू शकतो. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटची स्पीड सुपर फास्ट हवी असे तुम्हाला वाटत असेल तर काही गोष्टी चुकूनही करू नका. यामुळे तुमच्या फोनची इंटरनेट स्पीड स्लो होवू शकते.

जिओ असो की एअरटेल अनेकदा आपण पाहतो की, फोन चेंज करताना इंटरनेट स्पीड स्लो होते. याच्या पाठीमागचे कारण म्हणजे आपण प्रायमरी सिमला सेकंडरी सिम मध्ये स्लॉट टाकतो. परंतु, आपल्याला ही चूक माहिती नसते. कारण, प्रायमरी स्लॉट मध्ये जर सिम टाकले तर याने इंटरनेट स्पीड चांगली मिळते. तर सेकंडरी स्लॉटमध्ये जर सिम टाकले तर याची इंटरनेट स्पीड जास्त मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सिमला इंटरनेट वापर करताना नेहमी प्रायमरी सिम स्लॉट मध्ये टाका.

याशिवाय, सिम अस्वच्छ असल्याने सुद्धा इंटरनेट स्पीड स्लो होते. सिम अस्वच्छ असल्याने नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. जर तुमच्यासोबत सुद्धा असे होत असेल तर तात्काळ सिमला स्वच्छ करून घ्यायला हवे. कारण, असे असल्याने स्मार्टफोन सिम रीड करीत नाही. असे झाले तर आपल्याला कॉलिंग करायला सुद्धा अडचण येते.

वाचाः Jio Phone झाला १५०० रुपयांनी स्वस्त, फोनमध्ये वनप्लससारखे फीचर्स

सध्या WiFi Calling चे ट्रेंड खूप सुरू आहे. म्हणजेच WiFi Area मध्ये इंटरनेटच्या मदतीने कॉलिंग होवू शकते. परंतु, आपण ज्यावेळी WiFi Area मधून बाहेर येतो. त्यावेळी कॉलिंग करू शकत नाही. त्यामुळे असा प्रयत्न करायला हवा की, फोन एकदा Aeroplane Mode वर On केल्यानंतर Aeroplane Mode ला Off करा. असे केल्याने फोनचे नेटवर्क पुन्हा चांगले होते.

वाचाः Google ने १६ ॲप्सला प्ले स्टोरवरून हटवले, तुमच्या फोनमध्ये आहे का चेक करा लिस्ट

वाचाः ५० हजाराचा स्मार्टफोन फक्त २८ हजारात मिळतोय, ऑफर फक्त आणखी दोन दिवस

Source link

Leave a Reply