Headlines

Internet Tips : Wi-Fi सेटअप योग्य असुनही इंटरनेट काम करत नसेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स

[ad_1]

नवी दिल्ली: Wi-Fi Speed: सध्या इंटरनेटशिवाय शहरी जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. डिजिटल इंडिया संकल्पना आणि स्वस्त जिओ योजनांमुळे इंटरनेट खेडोपाडी आणि शहरांपर्यंत पोहोचले आहे. तसेच, करोनामुळे जग खूप वेगाने डिजिटली कनेक्ट झाले आहे आणि आजच्या युगात वायफायची सुविधाही देशातील लाखो घरांमध्ये पाहायला मिळते. पण, काही वेळा वाय-फायमध्ये काही विचित्र समस्या येतात. सगळे सेटअप नीट असून देखील इंटरनेट काम करत करत नाही. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर घाबरण्याची गरज नाही आणि खाली दिलेल्या चार पद्धतींद्वारे तुम्ही तुमची वाय-फाय कनेक्टिव्हिटी रिस्टोअर करू शकता.

वाचा: Budget Phones: नवीन फोन खरेदी करताना OPPO च्या ‘या’ स्वस्त स्मार्टफोन्सचा विचार नक्की करा

Wi-Fi शी पुन्हा कनेक्ट करा:

ही सर्वात सामान्य पद्धत आहे. तुमच्या फोनमध्ये वाय-फाय कनेक्ट केल्यानंतर फोन किंवा लॅपटॉपमध्ये इंटरनेट काम करत नसेल, तर तुम्ही सर्वप्रथम फोनवरून वाय-फाय डिस्कनेक्ट करा. थोड्या वेळाने तुम्ही Wi-Fi शी कनेक्ट करू शकता. याचा फायदा म्हणजे वाय-फाय मधील समस्या दूर करता येईल आणि वाय-फाय सोबत इंटरनेट पुन्हा चालू होईल.

वाचा: Latest Smartwatch: Samsung च्या २ भन्नाट स्मार्टवॉचेस लाँच, वॉच ECG, BP सह तुमच्या स्ट्रेस लेव्हलवर लक्ष ठेवणार

Forget WiFi नेटवर्क :

यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वाय-फाय विभागात जा. त्यानंतर Forget या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर वाय-फाय नेटवर्कवर पुन्हा शोधा. आता पासवर्ड टाकून वाय-फाय नेटवर्कशी पुन्हा कनेक्ट करा. त्यामुळे वाय-फायची समस्या दूर होऊ शकते.

DNS सर्व्हर बदला:

DNS सर्व्हर वेबसाइट लिंकला IP Address मध्ये रूपांतरित करतो. वाय-फायशी कनेक्ट केलेले असतानाही जर इंटरनेट अँड्रॉइड फोनवर काम करत नसेल, तर ते इंटरनेट प्रदात्याच्या डोमेन सर्व्हरमधील समस्येमुळे देखील असू शकते. त्यामुळे डीएनएस बदलूनही काही वेळा वाय-फायची समस्या दूर होते.

राउटरच्या सेटिंग्ज देखील तपासा :

जर कोणतीही पद्धत काम करत नसेल तर तुम्ही तुमचे राउटर तपासा. काही वेळा राउटरच्या समस्येमुळे सुद्धा वाय-फाय योग्यरित्या काम करत नाही.अशा वेळी राउटर रीस्टार्ट करा आणि त्यानंतर वायफायची समस्या फिक्स करा.

वाचा: Raksha Bandhan 2022: बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ कूल गॅजेट्स, फीचर्स भारी पण, किंमत कमी

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *