Headlines

पूर ओसरल्यानंतर कीटकजन्य आजारांचा धोका ; नियंत्रणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशासनांना सूचना

[ad_1]

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाऊस नियंत्रणात आल्यानंतर कीटकजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घरोघरी भेटी देऊन तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करावे तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, असे आदेश आरोग्य संचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.

पूर परिस्थिती निर्माण झालेल्या गावांमध्ये पूर ओसरल्यानंतर साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी जिल्हा रुग्णालये, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत. पुरामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर कीटकजन्य आजार वाढण्याचा धोका असतो. सध्या राज्याच्या काही भागांमध्ये डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तापाच्या रुग्णांचे निदान ४८ तासांमध्ये करण्यात यावे, हिवतापाचे निदान करण्यासाठी वेगवान चाचण्या करण्याचे, तसेच डेंग्यू आणि चिकनगुनिया चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डेंग्यूच्या डासांची वाढ रोखण्यासाठी पूरग्रस्त भागातील पाणी साचून राहिलेल्या ठिकाणी डासनाशक औषधांची फवारणी करावी. दलदलीची ठिकाणे, पुरामुळे वाहुन आलेले कचऱ्याचे ढीग अशा ठिकाणी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागांना पिण्याचा पाणीपुरवठा करताना पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे, घराघरातील पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक औषधे आणि द्रावणांचा पुरवठा करावा अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्यात वावरलेल्या नागरिकांना लेप्टोस्पायरसिसचा धोका संभवतो. त्या पार्श्वभूमीवर जोखमीच्या क्षेत्रातील नागरिकांना डॉक्सीसायक्लीन हे औषध आवश्यकतेप्रमाणे देण्याबाबतचे आदेशही आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

लस साठा सुरक्षित ठेवा

पुराने वेढल्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यालयांमध्ये तसेच आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांचा वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्या पार्श्वभूमीवर करोना प्रतिबंधात्मक लशींचा साठा वाया जाण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी विद्युत पुरवठा उपलब्ध असलेल्या ठिकाणी किंवा जिल्हा स्तरावरील शीतसाखळय़ांमध्ये लशींचा साठा हलवण्यात यावा, अशा सूचना आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *