Headlines

इंदूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, पुलावरुन खाली कोसळून १३ जणांचा मृत्यू | A bus fell from bridge coming to Pune in Indore Madhya Pradesh sgy 87

[ad_1]

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. बस धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “आम्ही दुर्घटनेची सविस्तर माहिती घेत आहोत. महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. १३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे”.

“ही बस अंमळनेरकडे निघाली होती. महाराष्ट्राचे एसटी महामंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. जळगाव, धुळेमधून अधिकारी पोहोचल्यानंतर अधिक माहिती मिळेल,” असंही त्यांनी सांगितलं. हेल्पलाईन क्रमांकही सुरु केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *