Headlines

भारतीय सैन्य दलात योगदान देणारे महाराष्ट्रातील ‘परम विशिष्ट सेवा पदक’, ‘शौर्य पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

[ad_1]

मुंबई, दि. 25 :- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त), ले.जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य 11 अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत. हा आपल्या राज्याचा गौरव आहे. महाराष्ट्रातील या पदक विजेत्या अधिकाऱ्यांनी आपल्या राज्याची मान देशात उंचावली असून त्यांच्या कामगिरीचा, कर्तृत्वाचा सार्थ अभिमान असल्याचे गौरोवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदक विजेत्या अधिकारी, जवानांचे अभिनंदन केले आहे.

भारतीय सैन्य दलात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रच्या शूर-वीर अधिकारी, जवानांचा झालेला सन्मान सर्वांना प्रेरणा देणारा आहे. ही बाब राज्यासाठी अभिमानाची आनंदाची असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी पदक विजेत्या अधिकारी, जवानांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण 317 आणि नौदलाच्या एकूण 34 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ जाहीर केले आहेत. या पदकांमध्ये 22 ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम),4 ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम),40 ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम) ,6 ‘शौर्य चक्र’, 84 ‘सेना पदक’ (शौर्य) ,10 ‘युध्द सेवा पदक’, 40 ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), 93 ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी 44 पदक आणि नौदलाच्या 8 नौसेना पदकांचा समावेश आहे.
००००००००००

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *