बार्शी नपाच्या रणधुमाळीत भारतीय काँग्रेस पक्षाची उडी , निवडणूक लढविण्याची केली घोषणा

भारतीय कॉंग्रेस पक्ष आगामी निवडणुका लढविणार-अध्यक्ष इस्माईल पठाण

बार्शी:- २०२२ मध्ये होणाऱ्या बार्शी नगरपालिकेची निवडणूक भारतीय कॉंग्रेस पक्ष लढविणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी दिली.बार्शीच्या विकासासाठी, तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व निवडणुकीत युवकांना प्राधान्य दिले जाईल.युवकांनी व बार्शीतील जनतेने कोणाच्याही दबावाला बळी न पडता भारतीय कॉंग्रेस पक्षात सामील व्हावे,व येणाऱ्या निवडणुकीत आपल्या युवा शक्तीचा जोर दाखवून द्या.तसेच नगर पालिकेच्या निवडणुक लढवायची इच्छुकांनी पक्षाच्या कार्यालयाशी किंवा मो.नं ९६८९५७६७५६ वर संपर्क साधावा.असे पक्षाचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी आवाहन केले आहे.

यावेळी पक्षाचे दिपक बोधले,रसुल सय्यद, अल्पसंख्याक काँग्रेसचे निहाल आतार, विद्यार्थी काँग्रेसचे आरबाज पठाण, तन्वीर पठाण व इतर उपस्थित होते.

Leave a Reply