Headlines

भारतीय नागरिकत्वं मिळवण्यासाठी आलियाला उचलावं लागणार मोठं पाऊल 

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt Birthday) आज २९ वा वाढदिवस. आलियाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये आलियाने उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. प्रेक्षकांनी आलियाचा प्रत्येक सिनेमा पसंत केला आहे. उत्तम सिनेमे देऊन भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आलियाला मतदान करण्याचा अधिकार मात्र नाही. कारण प्रत्येकाला थक्क करणारं. 

आलियाला मतदानाचा अधिकार नसण्याच प्रमुख कारण 

आलिया भट्टचा जन्म ब्रिटनमध्ये झाला. आलियाची आजी जर्मन आहे तर आजोबा कश्मिरी पंडित आहे. (Alia Bhatt and Kashmiri Heights Connection) आलियाच्या जन्माच्यावेळी सोनी राजगान यूकेत आपल्या आईजवळ गेली होती. तेथेच आलिया भट्टचा जन्म झाला. याकारणामुळे आलिया ब्रिटीश नागरिक आहे. तिच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. 

आलियाची आई सोनी राजदान याही ब्रिटिश नागरिक आहेत. त्यामुळेच आलियाला देशात मतदानाचा अधिकार नाही कारण ती कागदावर परदेशी आहे. मात्र, जर तिने रणबीर कपूरशी लग्न केले तर तिला भारतीय असण्याचे हक्क नक्कीच मिळतील.

पहिल्या सिनेमाकरता वजन केलं कमी 

आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 रोजी प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांच्या घरी झाला. आलियाची धाकटी बहीण शाहीन भट्ट आहे, याशिवाय पूजा भट्ट आणि राहुल भट्ट तिची सावत्र भावंडे आहेत.

1999 मध्ये वडिलांच्या थ्रिलर चित्रपट ‘संघर्ष’मध्ये ती बालकलाकार म्हणून पहिल्यांदा पडद्यावर दिसली. त्यावेळी आलिया फक्त 6 वर्षांची होती.

पण अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात 2012 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून झाली. या चित्रपटासाठी आलियाने 400 ते 500 मुलींसोबत ऑडिशन दिली आणि निवड झाल्यानंतर तिने सुमारे 16 किलो वजन कमी केले.

आलिया भट्टने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘राझी’, ‘गली बॉय’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

आलिया केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही तर प्रॉडक्शन हाऊसची मालकही आहे. आलिया भट्टच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘इटर्नल सनशाईन’ असून त्याखाली ती ‘डार्लिंग्स’ नावाचा चित्रपटही करत आहे.

आलियाचे सिनेमे 

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीकडे यावर्षी अनेक मोठे चित्रपट उपलब्ध आहेत. मार्च 2022 मध्ये, अभिनेत्री एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात रामचरण आणि जूनियर एनटीआरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

त्याचबरोबर आलिया भट्ट देखील बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात वर्षाच्या अखेरपर्यंत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *