Headlines

IND vs ZIM : रोहितसेना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज, रविवारी रंगणार भारत-झिंबाब्वे सामना

[ad_1]

IND vs ZIM : टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये (T 20 World Cup 2022) टीम इंडिया (Indian Cricket Team) रविवारी 6 नोव्हेंबरला झिंबाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) भिडणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना सेमी फायनलच्या (Semi Final) दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सेमीफायनलचं तिकीट नक्की करण्याच्या उद्देशाने रोहितसेना मैदानात उतरणार आहे. या सामन्याला दुपारी दीड वाजता मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (Melbourne Cricket Ground) सुरुवात होणार आहे. (t 20 world cup 2022 ind vs zim head to head record team india set to reach semi final round)

असे आहेत आकडे

टीम इंडिया आणि  झिंबाब्वे यांच्यात आतापर्यंत टी 20 प्रकारात एकूण 7 वेळा  आमनासामना झालाय. यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा राहिलाय. टीम इंडियाने 7 पैकी 5 सामन्यात विजय मिळवलाय. तर 2 वेळा झिंबाब्वेने भारताला पराभवाची धुळ चारलीय. त्यामुळे आकडेवारी टीम इंडियाच्याच बाजूने आहे. 

तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील पहिलाच पराभव आहे. त्यामुळे टीम इंडियाला जर सेमी फायनलमध्ये पोहचायचं असेल तर झिंबाब्वे विरुद्धचा विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात कशी कामगिरी करतं, याकडे क्रिकेट विश्ववाचं लक्ष असणार आहे. 

टीम इंडिया 

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आणि अर्शदीप सिंग.

टीम झिंबाब्वे 

क्रेग एर्विन (कॅप्टन), रयान बर्ल, रेजिस चकबवा, तेंदई चटारा , ब्रॅडली इवांस, ल्यूक जोंगवे , क्लाइव मदांडे, वेस्ली मधेवेरे, वेलिंगटन मसाकाद्जा, टोनी मुन्योंगा, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, सिकंदर रजा, मिल्टन शुम्बा आणि सीन विलियम्स. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *