Headlines

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचं भारताशी खास कनेक्शन, जाणून घ्या

[ad_1]

मुंबई :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. रविवारचा पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात टेंबा बावुमाच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार पदाची जबाबदारी केशव महाराजकडे आली होती. या केशव महाराजचे भारताची एक खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊयात. 

दक्षिण आफ्रिकेचा डावखूरा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1990 रोजी डर्बन येथे झाला होता. त्याने क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली. आणि त्यानंतर पूढे सामने खेळत खेळत तो फिरकी गोलंदाज झाला. केशवच्या कुटुंबात चार सदस्य आहेत. क्रिकेटर व्यतिरिक्त, त्याचे आई-वडील आणि एक बहीण आहे, ज्याचे लग्न श्रीलंकेतील एका व्यक्तीशी झाले आहे.

पूर्वज भारतीय 
केशव महाराजचे पूर्वज एकेकाळी भारतात राहत होते. त्यांना १८७४ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथून दक्षिण आफ्रिकेत कामासाठी आणण्यात आले होते. 

वडील आणि आजोबाही क्रिकेट खेळायचे
केशव महाराज यांचे वडील आत्मानंद हे देखील एक क्रिकेटपटू होते, जे दक्षिण आफ्रिकेसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले होते. मात्र, आत्मानंद यांना कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. आजोबाही क्रिकेटपटू होते. 

हनुमानाचा भक्त 
केशव महाराज हा भगवान हनुमानाचा परम भक्त आहेत. दक्षिण आफ्रिकेत राहूनही तो भारतीय प्रथा पाळत आहे. भारतीय सणही साजरे करतो. 

 3.3 ओव्हर्सनंतर सामना रद्द 
भारत- दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा टी20 सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस आला आणि सामना सुरू होण्यास 50 मिनिटे उशीर झाला. त्यामुळे सामना 19 षटकांचा झाला. पुन्हा सामना सुरु झाल्यानंतर चौथ्या षटकात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. भारताने 3.3 षटकांत 2 बाद 28 धावा केल्या होत्या. सामन्यादरम्यान केवळ 16 मिनिटांचा खेळ होऊ शकला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *