Headlines

भारत-पाकिस्तान फायनल होऊ देणार नाही, सेमीफायनल आधी इंग्लंडच्या कर्णधाराचं चॅलेंज

[ad_1]

IND vs Eng SemiFinal T20 World Cup 2022: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) संघात सेमीफायलनचा सामना रंगणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत (Pakistan Team) भिडणार आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत फायनलमध्ये धडक दिली आहे. पाकिस्तान संघ जवळपास बाहेर झाला होता. पण नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि सगळं गणित बदललं. त्यामुळे आता पाकिस्तान संघाला थेट फायनल गाठण्यात यश आलं आहे. आता भारत-पाकिस्तान संघात फायनल बघण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने (Jos Buttler) याआधी मोठं वक्तव्य केलंय.

जोस बटलरचं वक्तव्य (Jos Buttler)

सेमीफायनलमध्ये टीम इंडिया गुरुवारी इंग्लंड सोबत भिडणार आहे. हा सामना 10 नोव्हेंबर रोजी एडिलेडमध्ये खेळला जाणार आहे. जोस बटलरने (Jos Buttler) त्याआधी म्हटलं की, आम्ही भारत-पाकिस्तानमध्ये (India vs pakistan) फायनल सामना होऊ देणार नाहीत.आम्ही प्रयत्न करु की, भारत फायनलमध्ये जाणार नाही.

जोस बटलरने म्हटलं की, आम्ही ग्रेट इंडियन टीम विरुद्ध खेळण्यासाठी उत्सूक आहोत. डेविड मलान आणि मार्क वुड दुखापतीमुळे खेळणार की नाही याबाबत अजून काहीही माहिती पुढे आलेली नाही.

‘भुवनेश्वर कुमार चांगला गोलंदाज आहे. मी त्याला घाबरत नाही. भारतीय टीम चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण मला माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. सूर्यकुमार यादव शानदार खेळतोय.’

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर.

इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, एलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम करन, क्रिस जॉर्डन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, फिल साल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेविड विली, क्रिस वोक्स और मार्क वुड.

राखीव खेळाडू : लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लीसन



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *