खरंच हिऱ्यांनी सजवली Shahrukh Khan ने ‘मन्नत’ची नेमप्लेट? गौरीने सांगितलं कारण


Shahrukh Khan : अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) आणि पत्नी गौरी खान (gauri khan) यांची लव्हस्टोरी (lovestory) आज प्रत्येकाला माहिती आहे. शुन्यापासून करिअरला सुरुवात केलेला अभिनेता आज यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. शाहरुख त्याच्या प्रोफेशन कमी पण खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत असतो. आता देखील शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याबद्दल चर्चा रंगत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने ‘मन्नत’ची नेमप्लेट बदलली. हिऱ्यांनी जडलेली नेमप्लेट पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. (shahrukh khan wife gauri khan)

पण ‘मन्नत’च्या नेमप्लेटमागे एक सत्य आहे. ज्याचा खुलासा गौरी खानने एक पोस्ट करत केला आहे. गौरीने बंगल्या बाहेरील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. सध्या गौरीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (gauri khan big statement on Shahrukh Khans mannat nameplate)

पोस्टमध्ये काय म्हणाली गौरी…

‘घराचा मुख्य दरवाजा तुमच्या कुटुंब आणि मित्र परिवारासाठी एंट्री पांइट असतो. त्यामुळे नेमप्लेटमध्ये सकारात्मक ऊर्जा अत्यंत गरजेची असते. म्हणून आम्ही नेमप्लेटसाठी क्रिस्टल ग्लाससोबतच एका ट्रांसपेरेंट गोष्टीची निवड केली. ज्यामुळे सकारात्मक आणि उत्साह निर्माण करणारी भावना मनात येते…’ असं गौरीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. (gauri khan net worth)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची पत्नी गौरी खान व्यवसायाने इंटिरिअर डिझाईनर आहे. गौरी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरी तिच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

शाहरुख खानचे चाहते…
अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्याला भेटण्यासाठी त्याचा प्रत्येक चाहता प्रचंड उत्सुक असतो. एवढंच नाही तर अभिनेत्याची एक झलक पाहाण्यासाठी चाहते मुंबईतील त्याच्या ‘मन्नत’बाहेर उभे असतात. (shahrukh khan mannat haunted)

शिवाय शाहरुखच्या बंगल्याबाहेर ‘मन्नत’ म्हणून नावाची पाटी लागली आहे. त्या नावाच्या पाटी समोर उभे राहून देखील चाहते फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण ज्या ‘मन्नत’बाहेर चाहते फोटो काढयचे त्या नावामध्ये मोठा बदल झालेला आहे. (shahrukh khan social media)

शाहरुखच्या ‘मन्नत’बंगल्यात झालेला बदल सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची पाटी बदलली आहे. फोटो व्हायरल होताचं अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहे. एवढंच नाही तर शाहरुखचा बंगला ‘मन्नत’च्या आधीच्या पाट्या देखील समोर आल्या आहेत. Source link

Leave a Reply