IND vs ZIM : गावस्करांनी दीपक चहरला म्हटले गंजलेला खेळाडू, गोलंदाजाने दिले चोख प्रत्युत्तर


Team India : टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामन्यात 10 गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर (ind vs zimbabwe) 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते. शिखर धवन (shikhar dhawan) आणि शुभमन गिल (shubman gill) या सलामीच्या जोडीने हे लक्ष्य सहज गाठलं. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. शिखर धवन आणि शुभमन गिल या दोघांनीही या सामन्यात नाबाद अर्धशतके झळकावली. शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या.

गोलंदाजीमध्ये, दीपक चहरने (deepak chahar) 3 विकेट घेतल्या. तर वेगवान गोलंदाज कृष्णा आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनीही ३-३ विकेट्स घेतल्या. असे असतानाही समालोचक रोहन गावसकर यांनी दीपक चहरवर बाबात केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.

दुखापतीमुळे तब्बल सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरने सामन्याच्या सुरुवातीला सलग सात षटके टाकली. त्याला लयीत यायला थोडा वेळ लागला. पण त्याला सामन्यानंतर सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले,

मात्र समालोचनात रोहन गावस्कर यांनी त्याच्या खेळीला गंज लागला आहे असे म्हटले होते. याबाबत अॅलन विल्किन्सने सामन्यानंतर चहरला याबाबत विचारण्यात आले. “मला वाटते ‘गंज लागलेला’ हा शब्द कॉमेंट्रीमध्ये आला आहे, कदाचित रोहन गावस्कर यांनी असे म्हटले असेल. ते सहमत असतली, पण तुला कसे वाटले? तुला तुझी लय सापडली?” असा सवाल विल्किन्सने केला.
 
याच प्रश्नावर सामनावीर ठरल्यानंतर दीपक चहर प्रत्युत्तर दिलं आहे. “इथे येण्यापूर्वी मी काही सराव सामने खेळलो.  पण जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असाल तेव्हा तुम्हाला तुमचे 100 टक्के देणे आवश्यक असते आणि ते द्यायलाच हवे. मला वाटते की पहिल्या काही षटकांमध्ये माझे शरीर आणि मन एकत्र काम करत नव्हते, परंतु त्यानंतर सर्व काही ठीक होते,” असे चहरने म्हटले.

दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल याने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा डाव 189 धावांवर आटोपला. डावातील शेवटची विकेट अक्षर पटेलच्या नावावर होती. झिम्बाब्वेकडून रेगिस चकाबवाने 35, रिचर्ड नागरवाने 34 आणि ब्रॅड इव्हान्सने 33 धावा केल्या.Source link

Leave a Reply