Headlines

IND vs ZIM: बीसीसीआयची मोठी घोषणा, आता शिखर धवन नाही तर ‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचं नेतृत्व

[ad_1]

Team India in Zimbabwe: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर (West Indies Tour) भारतीय क्रिकेट टीम झिम्बाव्बे दौरा (Team India Tour of Zimbabwe 2022) करणार आहे. 18 ऑगस्टपासून हा दौरा सुरु होणार आहे.  झिम्बाव्बे दौऱ्यासाठी भारतीय संघाची धुरा शिखर धवनवर (Shikhar Dhavan) सोपवण्यात आली होती. पण आता बीसीसीआयने (BCCI) मोठी घोषणा केली आहे.

झिम्बाव्बे दौऱ्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदावरुन शिखर धवनची उचलबांगडी करण्यात आली आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार म्हणून के एल राहुलच्या (KL Rahul) नावाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. के एल राहुलच्या फिटनेसबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता के एल राहुल पूर्णपणे तंदरुस्त असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे संघाची धुरा के एल राहुलच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.  

हरारे मैदानावर होणार सर्व सामने
भारत आणि झिम्बाव्बे दरम्यानचा पहिली एकदिवसीय सामना 18 ऑगस्टला खेळवला जाणार आहे. तर 20 ऑगस्टला दुसरा आणि 22 ऑगस्टला तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना होणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12.45 वाजता सुरु होतील. या मालिकेसाठी राहुल त्रिपाठी आणि वॉशिंग्टन सुंदर या युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. 

झिम्बाव्बे दौऱ्यासाठी भारतीय संघ

केएल राहुल (कर्णधार) शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सैमसन (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *