IND vs WI | कॅप्टन Rohit sharma सोबत दुसऱ्या सामन्यात कोण करणार ओपनिंग?


मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला टी 20 सामना खूप रंजक झाला. दुसऱ्या टी 20 समन्यात सूर्यकुमार यादव खेळताना दिसणार की नाही याबाबत शंका आहे. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी अत्यंत वाईट होती. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. दुसऱ्या सामन्यात आता कॅप्टन रोहित शर्मा बदल करू शकतो. 

कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमारला बेंचवर बसवू शकतो. त्याच्या जागी धडाकेबाज खेळाडूला टीम इंडियात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. हा खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 

वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात सूर्यकुमार यादव फ्लॉप ठरला. त्याने पहिल्या सामन्यात फक्त 24 धावा जेमतेम केल्या. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमारच्या जागी ईशान किशनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ईशान किशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचा अनुभव आणि चांगला फॉर्म टीम इंडियासाठी फायद्याचा ठरू शकतो. टीम इंडियाला एक चांगली सुरुवात मिळू शकते. टी 20 वर्ल्ड कपसाठी याचा टीमला फायदा होऊ शकतो. 

ईशान किशन आणि रोहित शर्मा नवी ओपनिंग जोडी होऊ शकते. ही जोडी जर हिट ठरली तर के एल राहुल आणि शिखर धवन यांची ओपनिंगची जागा धोक्यात येणार आहे. 

ईशान किशन खूप चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्याला सिलेक्टर्सनी खेळण्याची संधी दिली नाही. ऋषभ पंतला खराब फॉर्म असूनही संधी देण्यात आली. आता रोहित शर्मा ईशानला आजमावू शकतो. त्यामुळे त्याला ओपनिंगसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

ईशान किशनची खतरनाक फलंदाजी अशी आहे.  IPL मेगा ऑक्शन 2022 मध्ये ईशान किशनला 15 कोटी 25 लाखांची बोली लावण्यात आली होती. इशान किशनने भारतासाठी तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 88 धावा आणि 18 टी-20 सामन्यात 532 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत तो रोहित शर्मासोबत सलामीचा सर्वात मोठा दावेदार बनला आहे.Source link

Leave a Reply