Headlines

Ind Vs WI | 22 वर्षांचा धडाकेबाज फलंदाज भरून काढणार रोहितची कमतरता

[ad_1]

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वन डे सामन्यांची सीरिज 27 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेत टीम इंडिया शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे वन डे सीरिजमध्ये पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.

या सीरिजमध्ये रोहितच्या जागी 22 वर्षीय शुभमन गिल ओपनिंगसाठी मैदानात उतरताना दिसू शकतो. या खेळाडूने 2020 मध्ये शेवटचा वन डे सामना खेळला होता. आता पुन्हा त्याला संधी देण्यत आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या वन डे सामन्यात शिखर धवन सलामीवीर म्हणून टीममध्ये खेळताना दिसणार आहे. त्याचवेळी 22 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल या दौऱ्यात त्याचा ओपनिंग पार्टनर म्हणून खेळताना दिसू शकतो. 

शुभमन गिल वेगवान धावा काढण्यासाठी ओळखला जातो. शुभमनची कामगिरी पाहता त्याला पुन्हा टीममध्ये खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. पहिली पसंत शुभमन असू शकते.

गिलने कसोटी आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली. मात्र वन डेसाठी त्याला फार संधी मिळाली नाही. शुभमन गिलने 2019 मध्ये टीम इंडियासाठी पहिला वन डे सामना खेळला होता, तर तो शेवटचा 2020 मध्ये खेळला होता. यादरम्यान शुभमन गिलने भारतासाठी केवळ 3 वन डे सामने खेळले. ज्यात त्याने 16.33 च्या सरासरीने केवळ 49 धावा केल्या आहेत.

टीम इंडियामध्ये शिभमन गिलचं कसोटी करिअर खूप चांगलं राहिलं आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक मॅच विनिंग डाव खेळले आहेत. त्याने 11 कसटी सामन्यात 579 धावा केल्या. यावेळी शुभमनने 4 अर्धशतक झळकवले आहेत. 

IPL 2022 मध्ये, शुभमन गिल गुजरात टायटन्स (GT) च्या टीमचा भाग होता. टीमला चॅम्पियन बनवण्यात त्याचं मोठं योगदान होतं. हार्दिक पांड्यानंतर गिलने सर्वाधिक धावा केल्या होत्या. शुभमन गिलने या हंगामातील 16 सामन्यांमध्ये 34.50 च्या सरासरीने आणि 132.32 च्या स्ट्राईक रेटने 483 धावा केल्या आहेत. मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही गिल पाचव्या क्रमांकावर आहे. शुभमन गिलनेही या हंगामात 4 अर्धशतकं झळकावली.

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *