Headlines

Ind vs SL : विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना, गौतम गंभीरला राग अनावर

[ad_1]

Virat Kohli Century : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कारकिर्दीतले 45वे शतक ठोकले होते. हे शतक ठोकून तो क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक पोहोचला आहे. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना होऊ लागली आहे.अनेक न्यूज चॅनेल आणि स्पोर्टस चॅनेलने देखील विराटची सचिनशी तुलना केली आहे. अशात आता या प्रकारावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर (gautam gambhir) चांगलाच संतापला आहे. नेमका तो काय म्हणालाय, हे जाणून घेऊयात. 

 

हे ही वाचा : Prithvi ShaW नव्हे, तर ‘या’ खेळाडूच्या नावे सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम,जाणून घ्या

 

नेमके प्रकरण काय?

विराट कोहलीने (virat kohli) नुकतेच श्रीलंकेविरूद्ध कारकिर्दीतले 45 वे शतक ठोकले होते. या शतकानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच विराट कोहली सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक देखील पोहोचला आहे. त्यामुळे विराट कोहलीची तुलना सचिन तेंडूलकरशी होऊ लागली आहे. मात्र ही तुलना गौतम गंभीरला (gautam gambhir) अजिबात पचली नसून त्याने संताप वक्त केला आहे. 

 

हे ही वाचा : ऋषभ पंत संदर्भातली सर्वात मोठी अपडेट,आता आयपीएलमधून झाला बाहेर 

 

गौतम गंभीर काय म्हणाला? 

स्टार स्पोर्टच्या शोवर विराटच्या सेंच्यूरीबाबत चर्चासत्र सुरु होते. या चर्चासत्रात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आणि टीम इंडियाचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर बसले होते. हे दोघेही विराट कोहलीच्या 45 व्या शतकावर चर्चा करत होते. मात्र विराटच्य़ा (gautam gambhir) सचिनशी होत असलेल्या तुलनेवर गंभीर अजिबात सहमत नव्हता. 

खरं सांगायचं तर ही काही रेकॉर्डची बाब नाही. विराट कोहली 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा जास्त शतके झळकावणार आहे. बघा, नियम बदलले आहेत, असे सुरुवातीला गौतम गंभीर म्हणतो. सचिनच्या तुलनेवर म्हणाला, ‘तुम्ही युगांची तुलना करू नका. पाच क्षेत्ररक्षकांसह दोन नवीन चेंडू असताना आताच्या तुलनेत एक नवीन चेंडू होता. त्या कालखंडाची तुलना करणे देखील योग्य नाही. पण हो, या फॉरमॅटमध्ये तो मास्टर ठरला आहे. इतके दिवस त्याने हे करून दाखवले, असे तो म्हणतोय.

संजय मांजरेकर काय म्हणाला? 

कोहली ओपनर नाही, त्यामुळे तो प्रत्येक 50 षटकांच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून फलंदाजी करत नाही.चांगली कल्पना येण्यासाठी तुम्हाला सर्व 100 डाव पहावे लागतील, विराटने बहुतांशी 3 ऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, त्यामुळे तुम्हाला हे देखील लक्षात ठेवावे लागेल, असे बोलत संजय मांजरेकरने पाठराखण केली. 

‘वनडेमध्ये शतक झळकावण्यात विराट तेंडुलकरच्या पुढे जाईल यात शंका नाही. म्हणजे. तेंडुलकरची बरोबरी करण्यासाठी कोहलीला फक्त 4 शतकांची गरज आहे. ते एक वर्ष किंवा सहा महिन्यांत होऊ शकते,असे देखील मांजरेकर म्हणालाय.  

दरम्यान गौतम गंभीर (gautam gambhir) आणि विराट कोहलीत आयपीएल सामन्यातील वादामुळे दुरावा आला होता. तसेच टीम इंडियातले 3 नंबरचे स्थान देखील विराटने बळकावले होते. त्यामुळे दोघांमध्ये दुरावा आला होता. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *