Headlines

IND vs SL | स्टार खेळाडूला संधी न दिल्याने राहुल-रोहित जोडी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

[ad_1]

मुंबई : बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (ind vs sl 2nd test match) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने (Team India) आधीच पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये युवा खेळाडूंना संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र संघात एकमेव बदल करण्यात आला. दुसऱ्या सामन्यातही स्टार गोलंदाजाला संधी न दिल्याने आता कॅप्टन रोहित शर्मा (Rahul Dravid) आणि कोच राहुल द्रविडवर (Rahul Dravid) हे नेटकऱ्याच्या निशाण्यावर आले आहेत. (ind vs sl 2nd test match team manegment has not given chance to mohammed siraj in playing 11 against sri lanka)

दुसऱ्या कसोटीत रोहितने मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा वगळलं. यामुळे रोहित आणि द्रविड सिराज जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायेत का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. सिराज घातक गोलंदाजांपैकी एक आहे. मात्र तो सध्या निवड न झाल्याने प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. 

नेटकऱ्याच्या निशाण्यावर रोहित-द्रविड

सिराजला संधी न दिल्याने रोहित-द्रविड नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. सिराजला वगळण्यावरुन वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सिराजने अशी काय चूक केलीय, की ज्यामुळे सिराजला वगळण्यात आलंय, असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.  

दरम्यान दुसऱ्या कसोटीत एकमेव बदल करण्यात आला. जयंत यादवच्या जागी रोहितने अक्षर पटेलला संधी दिली आहे.  

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *