Headlines

IND vs SL | श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहाचा मोठा विक्रम

[ad_1]

मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. ज्यामुळे भारताला दुसऱ्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहने मोठा कारनामा केला. बुमराहने 5 विकेट्स घेत अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. बुमराहने 2018 नंतर सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. यासह बुमराहने न्यूझीलंडच्या टीम साऊथीची बरोबरी केली. (ind vs sl 2nd test day 2 team india vice captain jasprit bumrah take 5 wickets hauls at at m chinnaswamy stadium bengaluru)

बुमराहच्या 300 विकेट्स

बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 विकेट्स पूर्ण केल्या. विशेष म्हणजे बुमराहची भारतात एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली. बुमराहने आतापर्यंत 29 कसोटी सामन्यात 8 वेळा 5 विकेट्स घेतल्या.

2018 नंतर सर्वाधिक टेस्ट 5 विकेट्स

जसप्रीत बुमराह – 8*
टीम साऊथी -8
जेसन होल्डर – 7
जेम्स एंडरसन – 6
हसन अली – 6
नॅथन लियोन – 6
तेजुल इस्लाम – 6

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

श्रीलंका प्लेइंग XI | दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो आणि प्रवीण जयविक्रमा.  



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *